ताज्याघडामोडी

शिक्षकाकडून शरीरसुखाची मागणी, घरी जात नवऱ्यासमोरही धमकी, मुख्याध्यापिकेचं टोकाचं पाऊल

देवपुरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर संतप्त भाजपा महिला मोर्चाने त्या शाळेत धडक देत आंदोलन केले. एवढे घडूनही संस्थेने दखल न घेतल्याने निषेध व्यक्त केला आहे. शिक्षकाकडून शरीरसुखाची वारंवार मागणी केली जात असल्याची तक्रार एका उर्दू शाळेतील मुख्याध्यापिकेने दोन दिवसांपूर्वी पोलिसांत […]

ताज्याघडामोडी

टेन्शन वाढलं! ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार, आता…

एकीकडे शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाल येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुखपदाचे नेमके काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची ५ […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा

ईडीचे अधिकारी सकाळी सहा वाजता मुश्रीफ यांच्या निवासस्थानी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे समजते. ईडीचे जवळपास २० अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील […]

ताज्याघडामोडी

आ.समाधान आवताडे,प्रशांत परिचारक यांच्यासह १४ सदस्यांची नियुक्ती

सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशीत व निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर  दिनांक १३ जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेली असतानाच आज राज्य शासनाने सोलापूर जिल्हा नियोजन समितीसाठी सदस्य म्हणून आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक,धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह एकूण १४ नामनिर्देशीत व निमंत्रित सदस्यांची यादी आज शासनाच्या नियोजन […]

ताज्याघडामोडी

व्हिडिओ कॉलवर अश्लील चाळे करणाऱ्या सुपरवायझरला भाजप कार्यकर्त्यांनी दिला चोप

नागपूर जिल्हातील मौदा पोलीस ठाण्याच्या समोरचं संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी आरोपीला चोप दिल्याची खळबळजनक घडली आहे. आरोपी हा मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथाळा भागातील खासगी कंपनीत कामाला आहे. रघुवेंद्र उपाध्याय असे आरोपीचे नाव असून तो सोबत काम करणाऱ्या सहकारी महिलेची छेड काढून वारंवार व्हिडीओ कॉल करून लज्जास्पद वर्तन करत होता.  महिलेला अश्लील व्हिडीओ चॅट -आरोपी हा […]

ताज्याघडामोडी

50 प्रवाशांना खालीच विसरुन ‘विमान उडाले आकाशी’, DGCA ने मागवला अहवाल

चक्क 50 प्रवाशांना खालीच विसरुनगो फर्स्ट कंपनीच्या विमानाने आकाशात उड्डाण केले. बंगळुरु येथे हा प्रकार घडला. विमानात बसण्यासाठी आलेल्या प्रवाशांना डांबरी रस्त्यावर बसमध्येच सोडून विमान आकाशात झेपावलेच कसे. क्रू मेंबर्स, पायलट आणि व्यवस्थापन नेमके काय करत होते, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थातच डीजीसीए याबाबत अहवाल मागवला आहे.  डीजीसीएने […]

ताज्याघडामोडी

पीटीच्या शिक्षकांनेच विद्यार्थिनीसोबत केलं अश्लील कृत्य

शहरातील सिडको परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली असून एका शाळेतील पिटी शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमन म्हणजेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील सिडको परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चौक परिसरातील एका शाळेत दहा वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने गैरवर्तन […]

ताज्याघडामोडी

तुम्ही लै माजलाय,निवडणूक होऊद्या एकेकाला खल्लास करतो !

पंढरपुरात माजी नगरसेवकाकडून बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी प्रताप गंगेकरसह दोघांविरोधात गुन्हा दाखल पंढरपूर शहरातील अनिल नगर परिसरात सातत्याने भाडणंतंटा होत असल्याच्या घटना घडत असतानाच यामागे राजकीय वर्चस्वाचे कारण असल्याचीही चर्चा सातत्याने होत आली आहे.रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजनेच्या सुमारास पुन्हा येथे गंभीर घटना घडली असून या बाबत  प्रशांत चौरे राहणार अनिल नगर […]

ताज्याघडामोडी

जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत” कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर चा ‘कृष्णा मकर’ पहिला

पंढपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेच्या चि.कृष्णा अमर मकर इ. ९वी या विद्यार्थ्यांने झपूर्झा व पु. ना. गाडगीळ यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या जिल्हास्तरीय स्पर्ध्येमध्ये पंढरपूरातील इतर शाळेचे जवळपास १०० विद्यार्थी सहभागी झालेले होते या सर्वामधून कृष्णा मकर याने ८वी व ९वी […]

ताज्याघडामोडी

पेनाने लिहिलेल्या २००, ५०० आणि २०००च्या नोटा अमान्य होणार? RBI ने दिलं उत्तर

सध्या सोशल मीडियावर २००, ५०० आणि २००० आणि इतर नोटांबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे. या नोटांवर काही लिहिलं असल्यास त्या चलनातून बाद होतील असा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. आता हा मेसेज खोटा असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. सरकारच्या अधिकृत फॅक्ट चेकर पीआयबीने सोशल मीडियावर फिरणाऱ्या या मेसेजमधील दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. […]