सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशीत व निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर
दिनांक १३ जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेली असतानाच आज राज्य शासनाने सोलापूर जिल्हा नियोजन समितीसाठी सदस्य म्हणून आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक,धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह एकूण १४ नामनिर्देशीत व निमंत्रित सदस्यांची यादी आज शासनाच्या नियोजन विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
आज जाहीर झालेल्या यादीनुसार आमदार समाधान आवताडे,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार प्रशांत परिचारक,शिवाजी सावंत(माढा),धैर्यशील मोहिते पाटील(माळशिरस),अण्णाराव बाराचारे (द.सोलापूर) यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून तर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून चनगोंडा हवीनाळे (द.सोलापूर),चेतनसिह केदार (सांगोला),गणेश चिवटे (करमाळा),योगेश बोबडे (टेंभुर्णी),केशवराव पाटील (माळशिरस),सुनील चव्हाण (मोहोळ),प्रदीप खांडेकर(मंगळवेढा),रफिक नदाफ (सांगोला),उमेश गायकवाड (सोलापूर),नारायण पाटील(करमाळा),अमोल शिंदे(सोलापूर),नागेश भोगडे (सोलापूर),अशोक दुस्सा (सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.