ताज्याघडामोडी

व्हिडिओ कॉलवर अश्लील चाळे करणाऱ्या सुपरवायझरला भाजप कार्यकर्त्यांनी दिला चोप

नागपूर जिल्हातील मौदा पोलीस ठाण्याच्या समोरचं संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी आरोपीला चोप दिल्याची खळबळजनक घडली आहे. आरोपी हा मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथाळा भागातील खासगी कंपनीत कामाला आहे. रघुवेंद्र उपाध्याय असे आरोपीचे नाव असून तो सोबत काम करणाऱ्या सहकारी महिलेची छेड काढून वारंवार व्हिडीओ कॉल करून लज्जास्पद वर्तन करत होता. 

महिलेला अश्लील व्हिडीओ चॅट -आरोपी हा वारंवार पिडीत महिलेच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत होता. तो महिलेला अश्लील व्हिडीओ चॅट करण्यास भाग पाडत असल्याने महिलेने मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मौदा पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात आणले असता आधीच तयारीत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.

आरोपीवर अचानक झालेल्या पोलिसांची तारांबळ उडाली, पोलिसांनी आरोपी रघुवेंद्रला जमावाच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे. या घटनेमुळे मौदा पोलीस स्टेशन येथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी आरोपीला अटक करत तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *