प्रसिध्द औषध कंपनी झायडस कॅडीलाने त्यांची झायकोव डी ही लस लॉंच करण्याच्या संदर्भात आपत्कालीन उपयोग प्राधिकरण अर्थात इयुएकडे परवानगी मागितली आहे. कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डिजिजिआयकडेही याबाबत अगोदरच अर्ज केला आहे. 12 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांसाठी ही लस असून त्याची तिसरी चाचणीही पूर्ण झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.झायकोव डी […]
ताज्याघडामोडी
तलवार हातात घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्याला अटक
हातात तलावर घेऊन दहशत पसरवत वाहनांची तोडफोड करणाऱ्या भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ विठठल घाडगे (वय 24, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाचे अधिकारी नितीन शिंदे आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी चिंतामणी ज्ञानपीठ चौकात हातामध्ये तलवार घेवून एकजण फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार […]
शिक्षकाच्या कार्याचा सन्मान: मिळाली 1 लाखाची स्कॉलरशिप
शिक्षकाच्या कार्याचा सन्मान: मिळाली 1 लाखाची स्कॉलरशिप व्होडाफोन आयडिया ही कम्युनिकेशन क्षेत्रातील नामांकित कंपनी शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना 1 लाख रुपयांची स्कॉलरशिप प्रदान करते. शिक्षणक्षेत्रात शिक्षकांचे महत्व अनन्य साधारण आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा व ते प्रेरित व्हावेत व त्याच्या माध्यमातून उत्कृष्ट विद्यार्थी घडावेत यासाठी व्होडाफोन आयडिया फाऊंडेशन त्यांच्या CSR फंडातून शिक्षकांना […]
पंतनगर फिटनेस सेंटरमध्ये राज्यस्तरीय फिटनेस एरोबीक्स शिबीर संपन्न
पंढरपूर, प्रतिनिधी सोलापूर शहर व जिल्हा स्पोर्टस एरोबीक्स व फिटनेस असोसिएशन व महाराष्ट्र स्पोर्टस एरोबीक्स व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने दि. 22 जुन ते 25 जुन रोजी पं ढरपूरमध्ये पंतनगर फिटनेस सेंटरमध्ये राज्यस्तरीय फिटनेस एरोबीक्स शिबीर पार पडले. फिटनेस एरोबीक्स म्हणजे संगिताच्या तालावर तालबध्द नियमानुसार केलेला व्यायाम प्रकार आहे. सदर खेळ हा चार प्रकारामध्ये शिकवला जातो. […]
मद्यधुंद पोलिसाचा कोविड सेंटरमध्ये हंगामा, कर्मचारीही झाले हतबल
मद्यधुंद अवस्थेतील एक पोलीस कोरोना झालेल्या एका आरोपीला घेऊन कोविड सेंटरमध्ये घुसला आणि त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. ऑन ड्युटी पोलिसाची ही अवस्था बघून आपण आता नेमकं काय करावं, हे कोविड सेंटरवरील कर्मचाऱ्यांनाही समजेना. त्यात पोलिसाने असा उग्र अवतार धारण केला की काही विचारता सोय नाही. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार, या म्हणीसारखी […]
करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कटूंबास ४ लाख रुपये आर्थिक मदत मिळणार ?
नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेतमुळे देशात एकच थैमान घातला होता. तसेच दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाच करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना आर्थिक हातभार लावण्यासंबंधी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला झटका देत मोठा निर्णय दिला आहे. सुरुवातीला केंद्राने करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई […]
संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पालवी’ मधील बालकांना फलाहाराचे वाटप ; पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम
संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पालवी’ मधील बालकांना फलाहाराचे वाटप ; पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम पंढरपूर (प्रतिनिधी):- संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘पालवी’ या संस्थेतील बालकांना फलाहाराचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीरआबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष स्वप्नील जगताप, […]
मतदारयादीत रंगीत छायाचित्र नसल्यास नावे वगळणार
ज्या मतदारांची रंगीत छायाचित्रे मतदारयादीत नाहीत, अशा मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता मतदारांना मतदारयादीत आपले छायाचित्र रंगीत आहे किंवा कसे, याची पडताळणी करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या मतदारयादीमधील छायाचित्रांची पडताळणी सुरू आहे. यामध्ये ज्या मतदारांचे छायाचित्रे मतदारयादीत नाहीत, त्यांची छायाचित्रे जमा केली जात आहेत. त्याचबरोबर रंगीत छायाचित्र […]
‘तू फक्त माझ्या पैशासाठी वापर केला’
तू फक्त माझ्या पैशाचा आणि माझ्या मनाचा वापर केला. मला न्याय हवा. मला मुलीची बदनामी नाही करायची बस…यासह प्रेयसीच्या सोबत लग्न करण्यास येणाऱ्या अडथळ्याची माहिती देणारी चिट्ठी लिहून अनुभव धाकडे (वय – 33, राहणार रमाबाई आंबेडकरनगर, अमरावती) या तरुणाने आत्महत्या केली आहे. अनुभव धाकडे याचे परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांची ओळख होती. […]
आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्यात येणार
पंढरपूर (दि.30):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्कम स्वरुपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसेसने पंढरपूरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपूरात येऊ […]











