ताज्याघडामोडी

मानाच्या पालख्यांचे आगमन

आषाढी एकादशीसाठी आज मानाच्या पालख्यांचे वाखरी येथे आगमन झाले. मानाच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार, कोरोनाच्या नियमांचे पालन करत आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मानाच्या पालख्यांचे आगमन वाखरी पालखी तळावर झाले. वाखरी पालखी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपच्या माजी नगरसेवकाने दिली खुनाची सुपारी,घटनेपूर्वीच सुपारी किलर पोलिसांच्या ताब्यात

पुणे कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे माजी नगरसेवक विवेक महादेव यादव यांनी त्यांचा विरोधक असलेल्या बबलू गवळी याच्या खूनाची सुपारी कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला दिली असल्याची व हे दोन्ही सराईत सुपारी किलर खुनाच्या हेतूने वावरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे गस्तीवर असताना पोलीस कर्मचारी सुशील धिवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी […]

ताज्याघडामोडी

उजनीतून भीमा नदीत ८० हजार क्युसेक्स पाणी सोडल्याचे पंढरपूर पंचायत समितीचे ते पत्र बोगस ?

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातील पाणी साठा वजा पातळीत असल्याच्या बातम्या दोनच दिवसापूर्वी माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर आज पंढरपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या सहीचे उजनी धरणातून ८० हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याचे एक पत्र विविध गावातील सोशल मीडियावर फिरू लागले आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली. उजनी धरण मायनस मध्ये आहे,आषाढी यात्रा भरली नाही,सोलापूर शहराने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुंबईत भररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद

मुंबईत एका वकिलावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बोरिवली भागात मारहाण करुन सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वकिलावरील हल्ल्याची एकाच दिवसात दुसरी घटना समोर आली आहे. तलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. 8 जुलै […]

ताज्याघडामोडी

आरोग्य उपकेंद्रसाठी ८ कोटी ४० लाखाचा निधी मंजूर : आमदार समाधान आवताडे

आरोग्य उपकेंद्रसाठी ८ कोटी ४० लाखाचा निधी मंजूर : आमदार समाधान आवताडे  मंगळवेढा – आरोग्यसेवा आयुक्तालय , महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासकीय आरोग्य संस्था श्रेणीवर्धन व बांधकामासाठी आशिया विकास बँक यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या निर्मितीसाठी ८ कोटी ४० लाख रुपयाच्या निधीस मंजूरी मिळाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी , अकोला , सलगर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माढ्याच्या सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील ४ आरोपी पसार

विविध गंभीर गुन्ह्यात माढा सबजेलमध्ये अटकेत असलेले सिद्धेश्वर कैचै,अकबर सिद्दाप्ना पवार,आकाश उर्फ अक्षय राॅकी भालकर,तानाजी लोकरे चार सराईत गुन्हेगार ड्युटीवर असलेल्या पोलिसांशी झटापट करून पळून जाण्यात यशस्वी ठरले असून या घटनेमुळे माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.या चारही आरोपीना ताब्यात घेण्यासाठी माढा पोलीस प्रयत्नांची शिकस्त करत असून सर्वत्र कडक नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे. […]

ताज्याघडामोडी

SBI कडून ग्राहकांसाठी नोटीस जारी, बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी लवकर करा ‘हे’ काम

 स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या सर्व ग्राहकांना नोटीस बजावली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बँकेने खातेदारांना पॅन-आधार कार्ड (पॅन-आधार) लिंक करण्यासाठीची सूचना देण्यात आली आहे. तसेच जे कोणी ग्राहक पॅन आणि आधार कार्ड लिंक करणार नाहीत, त्यांना भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जुना कराड नाका येथे भरधाव वेगातील रिक्षाच्या धडकेत रेल्वे अभियंत्यांचा मृत्यू

भरधाव वेगातील रिक्षा चालकाने पंढरपुर शहातील जुना कराडनाका नजीक ऍक्टिव्हा दुचाकीवरुन भाजी आणण्यासाठी निघालेले रेल्वेचे सिनिअर सेक्शन इंजिनीअर बबलु अहिरवार यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे जुना कराड नाका व रेल्वे कॉलनी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी रिक्षाचालक रामा सुनिल मोटे रा कोर्टी ता पंढरपुर याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा […]

ताज्याघडामोडी

४० हजारांची लाच घेणारा बालविकास प्रकल्प अधिकारी रंगेहाथ जेरबंद

शासकीय योजनेनुसार अंगणवाड्यांना देण्यात आलेल्या  गॅस कनेक्शनचे 5 लाख 64 हजार रुपयांचे बिल अदा करण्यासाठी  40 हजार रुपयांची लाच मागणारा परंडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके याला उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले असून एकच वर्षांपूर्वी नोकरीत रुजू झालेल्या या अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची लाच मागितली जाते यावरून शासकीय सेवेतील लाचखोर प्रवृत्ती किती […]

ताज्याघडामोडी

पक्षात या योग्य सन्मान मिळेल; पंकजा मुंडेंना शिवसेनेची ऑफर

मुंबई – मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त येत आहेत. सुरुवातीला विधान परिषदेसाठी डावलल्या नंतर केंद्रीय मंत्रीमंडळातही पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रितम मुंडे यांना डावलण्यात आले. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता शिवसेनेकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच […]