ताज्याघडामोडी

४० हजारांची लाच घेणारा बालविकास प्रकल्प अधिकारी रंगेहाथ जेरबंद

शासकीय योजनेनुसार अंगणवाड्यांना देण्यात आलेल्या  गॅस कनेक्शनचे 5 लाख 64 हजार रुपयांचे बिल अदा करण्यासाठी  40 हजार रुपयांची लाच मागणारा परंडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके याला उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले असून एकच वर्षांपूर्वी नोकरीत रुजू झालेल्या या अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची लाच मागितली जाते यावरून शासकीय सेवेतील लाचखोर प्रवृत्ती किती निर्ढावली आहे हेच दिसून येते.  

 लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडीत, पोलीस उप अधीक्षक प्रशांत सापते यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा खासगी व्यक्ती शासकीय काम करून घेण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी तक्रार देण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *