मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची तपासणी करून त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने १५ ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची वीज देयकांची वसुली व वीजतोडणी तोपर्यंत […]
ताज्याघडामोडी
काँग्रेस महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढविणार
काँग्रेस पक्ष आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढवेल अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे आज नाना पटोले दिल्लीत असून त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत राहुल यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती नाना […]
सचिव दिलीप पांढरपट्टे यांची पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट आषाढी वारीच्या कामाबाबत केले कौतुक
सचिव दिलीप पांढरपट्टे यांची पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट आषाढी वारीच्या कामाबाबत केले कौतुक पंढरपूर,दि.20: आषाढी वारीनिमित्त पहिल्यांदाच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी श्री. पांढरपट्टे यांना कामकाजाबाबतची माहिती दिली. यावेळी सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सचिव श्री. पांढरपट्टे […]
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या महिला डॉक्टरला अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटची लागण
आसाममधील एका महिला डॉक्टरला एकाच वेळी कोरोनाच्या डेल्टा आणि अल्फा या दोन्ही व्हॅरियंट्सची लागण झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या दिब्रुगड येथील प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रात केलेल्या चाचण्यांमधून यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एकाच वेळी दोन प्रकारच्या व्हॅरियंट्सची लागण होण्याची ही भारतातील पहिलीच ज्ञात घटना असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे […]
पंढरपूर नगर पालिकेस यंदाही यात्रा न भरता ५ कोटी यात्रा अनुदानाचा धनादेश मिळाला
सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढपुरात येत असतात.भूवैकुंठ समजल्या जाणाऱ्या या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेल्या भाविकांना कुठलीही समस्या जाणवू नये,या तिर्थक्षेत्राचा सर्वागीण विकास व्हावा म्हणून राज्य शासन पंढरपूरला निधी उपलब्ध करून देणयाबाबत कायम झुकते माप देत आले आहे.तर २००८ साली तात्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी संत तुकाराम महाराज जन्म चतुशताब्दी निमित्त विशेष आराखडा मंजूर करत २४० […]
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा येतोय म्हणून पोलिसांनी मारली शिट्टी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आषाढी एकादशी महापूजेसाठी पंढरपूरला येत असल्यामुळे त्यांच्या वाहनांचा ताफा येत असलेल्या रस्त्यावर जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पंढरपूर-करकंब रस्त्यावरील आजोती पाटी येथे बदोबस्तासाठी थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने येणारी एक दुचाकी अतिशय भरधाव वेगाने येत असल्याचे आढळून आले,करकंबकडून मुख्यमंत्रांच्या गाड्यांचा कॅनवाय येत असल्याने पोलिसांनी भरधाव वेगातील दुचाकी थांबविण्यासाठी शिट्टी मारली खरी […]
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे पंढरपूर दि. 20 – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला […]
मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडून मंदिर व्यवस्थेची पाहणी
मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांकडून मंदिर व्यवस्थेची पाहणी पंढरपूर,दि.19 : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर यांनी मंदिर परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, पोलीस […]
पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला सूचना
पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला सूचना पंढरपूर, दि.19: कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून […]
11 वीच्या सीईटी परीक्षेची तारीख ठरली, 21 ऑगस्टला होणार 11 वी सीईटीची परीक्षा
10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा […]











