गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुंड संदीप मोहोळ खूनप्रकरणात तिघांना ‘जन्मठेप’; गणेश मारणेसह 12 जणांची निर्दोष मुक्तता

गुंड संदीप मोहोळ याच्या खूनप्रकरणात तिघांना जन्मठेप आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, 12 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सचिन पोटे, जमीर शेख, संतोष लांडे यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. तर, तिघा आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी हा निकाल दिला. टोळीच्या वर्चस्व वादातून गुंड संदीप […]

ताज्याघडामोडी

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आमची परत बातमी दिली तर तुला जिवे ठार मारू !

भीमा नदीकाठच्या अनेक गावात वाळू चोरांनी उच्छाद मांडला असून नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांना दमदाटी करीत त्यांच्या शेतीतून वाट काढत अवैध वाळू उपसा करायचा,त्याच ठिकाणी साठा करायचा आणि शेतकऱ्याने विरोध केला तर त्याला दमदाटी करायची असे प्रकार सातत्याने होत असल्याची चर्चा आहे.अशातच पोलीस अथवा महसूलच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केलीच तर ज्या ठिकाणी वाळूचा साठा आढळून आला आहे त्या […]

ताज्याघडामोडी

ATM मधून पैसे काढणं महागणार, 5 ट्रॅन्झाक्शननंतर मोजावे लागणार एवढे रुपये

कोरोना काळात कुणाला नोकरी गेल्याचा तर कोणाचे पगार कापल्याचा तर कोणाला महागाईचा फटका बसला आहे. वाढते इंधनाचे आणि भाज्यांच्या दरामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडत आहे. तर आता दुसरीकडे एटीएम पैसे काढणाऱ्या लोकांनाही मोठा दणका बसणार आहे. आता आपलेच पैसे एटीएममधून काढणं अधिक महाग होणार आहे. बँकेनं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक पैसे एटीएममधून काढल्यानंतर बँका […]

ताज्याघडामोडी

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल

१९ जुलै रोजी खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. या कार्यक्रमास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी अनेकजण उपस्स्थत होते. या कार्यक्रमास गर्दी जमविल्याप्रकरणी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह चार जणांवर विटा पोलीस […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात ऑक्सिजनविना एकही मृत्यू नाही,आरोग्यमंत्री टोपेंचा दावा

महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. राज्याकडे उपलब्ध असणारा साठा मर्यादित होता. रात्रीतून गाडी पोहोचली नाही, तर सकाळी ऑक्सिजन मिळणार नाही, अशी परिस्थिती राज्यात होती. मात्र ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कळस गाठत असताना राज्यात ऑक्सिजनचा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल

गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा  गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर 26 जून 2021 ते 9 जुलै 2021 या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून एकूण 348 ठिकाणी तपासणी केली. यात 14 गुन्ह्यांची नोंद झाली असून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुळशी पॅटर्नची नक्कल करणारे स्टेट्स पडले महागात 

गावात आपलीच हवा असावी एखादी हिरोईन टाईप गर्लफ्रेंड असावी अशी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांनाही संख्या आपल्यात काही कमी नाही.कुणी स्पर्धा परीक्षांत यश मिळवून,सैनिक अथवा पोलीस भरती होऊन,विविध शालेय अथवा महाविद्यलयीन परीक्षांमध्ये यश मिळवून गावात नावलौकिक मिळवतात,शाश्वत हवा करतात.मात्र काही तरुण चित्रपटाप्रमाणेच जीवन असते असा समज करून घेत गुन्हेगारी वृत्तीचा अवलंब करत हवा करायला जातात,काही काळ आपल्या परिसरात […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीने गुन्हेगारांना उमेदवारी दिली,घड्याळ चिन्हच धोक्यात आले

उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या राष्ट्रीय पक्षांचं चिन्हं गोठवा किंवा त्या उमेदवाराला बरखास्त करा, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने  दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आल्याच्या एका प्रकरणात निवडणूक आयोगाने हा सल्ला कोर्टाला दिला आहे. कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करून निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेनंतर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष […]

ताज्याघडामोडी

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, ६ हजार १०० शिक्षकांच्या भरतीला राज्य सरकारची परवानगी

राज्यात तब्बल २ वर्षांनंतर शिक्षक पात्रता परीक्षा राज्य सरकारने घेण्याचे ठरवले आहे. कोरोना संकटामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या सध्या कोरोनापरीस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे राज्य सरकारने या परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. राज्यात एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त असून शिक्षण विभागात टप्प्याटप्प्यात एकूण ६ हजारहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता […]