ताज्याघडामोडी

कॅबिनेट बैठकीदरम्यान जयंत पाटील यांची तब्येत बिघडली, ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कॅबिनेट बैठकीदरम्यान प्रकृती बिघडली असून त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅबिनेटची बैठक सुरू असताना त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना बैठक अर्धवट सोडून रुग्णालयात नेण्यात आले. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तातडीनं ईसीजी करण्यात आलं असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयंत पाटीलांसोबत आरोग्य मंत्री राजेश […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा हात अमेरिकेतून पोहोचली मदत

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा हात अमेरिकेतून पोहोचली मदत               पंढरपूर दि. 28 :-  उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे  गरजू, गरीब कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येतात.  रुग्णांच्या उपचारासाठी सायकॉन कन्सल्टंटचे रमेश लोकरे आणि स्वाती यलमार (कन्सास, अमेरिका) तसेच  एन.राचमले फाऊंडेशन (अमेरिका)  यांच्या सौजन्याने बालरोग तज्ञ डॉ.आरदवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयास दोन ऑक्सिजन कॉन्संट्रेटर व […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू तस्करांवर कारवाई न करण्यासाठी महिना लाखाच्या हप्त्याची मागणी

 वाळू तस्करांवर कारवाई होऊ नये म्हणून उस्मानाबादमध्ये प्रत्येक महिन्याला लाख रुपयांचा हप्ता सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाच हप्ता स्वीकारत असताना वरिष्ठ अधिकारी मनिषा राशिनकरला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एक लाख १० हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली परंडा तालुक्यातील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुन्ह्यात अटक केल्याचा राग धरून निलंबित पोलिसावर खुनी हल्ला

मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आपल्याला पकडले याचा राग मनात ठेवून आरोपी आणि त्याच्या साथीदारांच्या टोळक्याने निलंबित पोलिसावर दगडाने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री येथे घडली. याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर तुकाराम सोनके (वय 41 रा. पोलीस कॉलनी, दिघी) यांनी मंगळवारी (दिनांक 27) दिघी पोलीस […]

ताज्याघडामोडी

पुरातत्व विभागाने सर्वंकष आराखडा तात्काळ  समितीकडे सादर करावा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

पुरातत्व विभागाने सर्वंकष आराखडा तात्काळ  समितीकडे सादर करावा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश      पंढरपूर दि. 27: –  लाखो वारकरी सांप्रदायाचे श्रध्दास्थान असलेल्या  विठ्ठल-रुक्मिणी   मंदीराचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी  तयार करण्यात आलेल्या सर्वंकष आराखडा भारतीय पुरातत्व विभागाने तात्काळ मंदीर समितीकडे सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिले. शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे मुख्यमंत्री उध्दव […]

ताज्याघडामोडी

चिंचणीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटनः आ.सुभाष देशमुख,आ.बबनदादा शिंदेंची उपस्थिती

*चिंचणीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटनः आ.सुभाष देशमुख,आ.बबनदादा शिंदेंची उपस्थिती* पंढरपूर ः चिंचणी पुर्न(ता.पंढरपूर ) येथे जिल्हा परिषद शाळा वर्गखोल्या,कर्मवीर भाऊराव पाटिल अभ्यासिका,पर्यटन रेस्टहाऊसयासह विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार सुभाषबापू देशमुख व आमदारा बबनदादा शिंदे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी शासकीय योजनांच्या निधीचा वापर 100%योग्य प्रकारे झाल्यानेच आज चिंचणी प्रगतीपथावर असल्याचे […]

ताज्याघडामोडी

सार्थ ज्ञानेश्‍वरी चे प्रकाशक ह.भ.प.भानुदास महाराज यादव  यांच्या अस्थी चे चंद्रभागेत विर्सजन

सार्थ ज्ञानेश्‍वरी चे प्रकाशक ह.भ.प.भानुदास महाराज यादव  यांच्या अस्थी चे चंद्रभागेत विर्सजन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते अस्थी पुजन पंढरपूर (प्रतिनिधी) :  आमदार परिचारक यांच्या वाड्यासमोरील श्रीगुरू रामचंद्र महाराज यादव यांच्या वैष्णव सदनातील सार्थ ज्ञानेश्‍वरी, विचार सागर,सार्थ अमृतानुभव, सार्थ ज्ञानेश्‍वरी अभंग गाथा, संत एकनाथ गाथा, आदि ग्रंथाचे प्रकाशक व वारकरी साप्रदायाच्या अनेक दिंडी चे मार्गदर्शक […]

ताज्याघडामोडी

शेतकर्‍यांच्या जनसंघर्षाला पहिले यश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घेतली  बैठक; 16 हजार शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत

शेतकर्‍यांच्या जनसंघर्षाला पहिले यश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी घेतली  बैठक; 16 हजार शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत । पंढरपूर, प्रतिनिधी गेल्या 30 वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात उजनी उजवा कालवा वितरिकेवरील भूसंपादन प्रश्‍न रेंगाळला असून या प्रश्‍नाचा कायमचा निपटारा करण्यासाठी व नव्याने पीक पाणी नोंदी धरून, नव्या रेडीरेकनर कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळण्यासाठी शेतकर्‍यांच्या सुशिक्षित मुलांनी जन संघर्षाचा लढा उभा […]

ताज्याघडामोडी

मतदार संघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आवताडे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

*मतदार संघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आवताडे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट* प्रतिनिधी : पंढरपूर – मंगळवेढा  पोटनिवडणुकीमध्ये परिवर्तनाची नांदी देत आवताडे हे आमदार झाले यावेळी मतदारसंघातील जनतेला विकासासाठी दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच कोणताही बडेजाव न करता कामास प्रारंभ केला. त्याचाच एक भाग म्हणून आ. समाधान आवताडे हे विकासासाठी दिल्ली दरबारी पोहचून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोहोरगाव येथे अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपुर तालुक्यातील पोहरगाव येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याचे समजताच पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी केलेल्या कारवाईत डम्पिंग ट्रेलर व वाळूसह ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला असून या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात 1) महेश दादाराव पाटील व 2) आकाश भारत गायकवाड दोघे रा. पोहोरगाव ,ता पंढरपुर यांच्या विरोधात भादवि 379, 34 […]