ताज्याघडामोडी

पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीसाठी केंद्राकडून पन्नास कोटी रुपयाचा निधी देणार

पंढरपूर नगरपरिषदेने आपल्या सर्वसाधारण सभा अजेंडा विषय क्र. ५ ठराव क्र. ३७ दिनांक ३०/०४/२०१२ आणि अजेंडा विषय क्र. २३ प्रो. क. ११९ दिनांक १४/०९/२०१२  नुसार झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेने वेळोवेळी शासनस्तरावर पत्रव्यवहार करून दिनांक १३/०७/२०१८ रोजी जा. क्र./पं न पं /न अ /२९१९/२०१८ नुसार सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या पंढरपूर नगरपरिषद […]

ताज्याघडामोडी

भारतामध्ये आढळून आल्या कोव्हिशिल्डच्या बनावट लसी; WHO आणि सीरमकडून दुजोरा

सध्या देशभरात व्यापक लसीकरणाची मोहीम राबवली जात असून १८ वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत.नागरिकांमध्ये या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाल्याची भावना असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने एका गंभीर गोष्टीकडे संपूर्ण जगाचे आणि विशेषत: भारताचे लक्ष वेधले आहे. […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेचा आणखी एक आमदार अडचणीत

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक शिवसेना आमदार अडचणीत येताना दिसून येत आहे. आयकर विभागाने यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. यामिनी यशवंत जाधव मुंबईतील भायखळा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत MIM च्या वारीस पठाणचा त्यांनी पराभव केला होता. आयकर विभागाने म्हटलंय की, २०१९ मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक […]

ताज्याघडामोडी

‘या’ शहरांमध्ये उद्यापासून 5 दिवस बँका राहतील बंद, आजच आटोपून घ्या बँकेचे सर्व व्यवहार

जर तुम्ही या आठवड्यात बँकेत जाण्याचा विचार केला, तर तुम्हाला तुमच्या शहरातील बँका बंद असतील.त्यामुळे जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित काही तातडीचे काम असेल तर आजच ते उरकून घ्या.उद्यापासून अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. दरम्यान, या आठवड्यात बँकांना गुरुवार पासून म्हणजेच १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट यादरम्यान सलग ५ दिवसांची सुट्टी असेल. मात्र बँकांच्या या सुट्ट्या […]

ताज्याघडामोडी

अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे यावर्षी दहावीचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना बहुतांश गुण मिळाले आहेत. आता न्यायालयाने अकरावीसाठी घेण्यात येणारी सीईटी देखील रद्द केल्यामुळे शहरातील नामवंत महाविद्यालयांचा कटऑफ वाढला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा वाढली आहे. दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. परंतु औरंगाबाद शहरातील संस्थांकडून होणारी मागणी यामुळे यंदापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करण्यात आली […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

महापुरानंतर काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणासह अनेक भागांत सध्या मुसळधार पावसाच्या सरी बसरत आहेत. तर काही भागांत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राज्यातील धरण क्षेत्रातही पावसाचा जोर आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत संततधार पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र येत्या १ ते २ दिवसांत […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ‘स्व.श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त’ आंतरशालेय कथाकथन व वक्तृत्व स्पर्धांचा बक्षिस सामारंभ संपन्न”

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ‘स्व.श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त’ आंतरशालेय कथाकथन व वक्तृत्व स्पर्धांचा बक्षिस सामारंभ संपन्न” कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये शुक्रवार, दि.१३.०८.२०२१ रोजी कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंतरशालेय ऑनलाईन कथाकथन व वक्तृत्व घेण्यात आल्या होत्या. स्पर्धा ही तीन वयोगटात घेण्यात आली. कथाकथन स्पर्धेकरिता प्रथम गट इ.१ ली ते ४ थी, दुसरा गट […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरटगाव येथून वाळू वाहतूक करण्याऱ्या पिकअपचा पोलिसांकडून भल्या पहाटे थरारक पाठलाग

पंढरपूर तालुक्यातील तरटगाव येथून माण नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकासह दोघांना पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून थरारक पाठलाग करून केलेल्या कारवाई करत सदर वाहन ताब्यात घेतले असून या प्रकरणी चालक अमित औदुंबर क्षिरसागर वय 19 वर्ष रा एकलासपुर ता पंढरपुर व मालक प्रथमेश सुभाष मोठे रा एकलासपुर ता पंढरपुर […]

ताज्याघडामोडी

आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी सरकारकडून नवे नियम जाहीर; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 देशात कुठेही गेलात तर तुमची ओळख एकाच ओळखपत्राने होण्यासाठी आधार कार्ड अत्यंत महत्वाचे मानले जाते. याच आधार कार्डात काही बदल करायचे असतील तर यासंदर्भातील नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. जर तुमचाही राहता पत्ता बदलला असेल आणि तुम्हाला आधार कार्डावर आपला बदललेला पत्ता अपडेट करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. युआयडीएआय […]

ताज्याघडामोडी

‘शरद पवार जिथे सभा घेतील तिथे पोलखोल सभा घेऊ’ भाजपचा इशारा

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेवून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणसंदर्भात जी भूमिका मांडली ती चूक असून खोटं बोल पण रेटून बोल’ अशी पवारसाहेब यांची भूमिका असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 75 वर्षांतून 16 वर्षे सत्ता वजा केली तर उर्वरित राज्य तुमचं, त्यावेळी 50 टक्केच्या वर आरक्षण द्यायला […]