गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरटगाव येथून वाळू वाहतूक करण्याऱ्या पिकअपचा पोलिसांकडून भल्या पहाटे थरारक पाठलाग

पंढरपूर तालुक्यातील तरटगाव येथून माण नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकासह दोघांना पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून थरारक पाठलाग करून केलेल्या कारवाई करत सदर वाहन ताब्यात घेतले असून या प्रकरणी चालक अमित औदुंबर क्षिरसागर वय 19 वर्ष रा एकलासपुर ता पंढरपुर व मालक प्रथमेश सुभाष मोठे रा एकलासपुर ता पंढरपुर यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम379,34सह गौणख खनिज कायदा 1978चे कलम4(1),4(क)(1)व21प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या बाबत पो.ना.सचिन आटपाडकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सोमवार दि.16/08/2021 रोजी पहाटे 06/00 वाजनेच्या सुमारास स.पो.नि.खरात यांना तरटगाव येथील माण नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.स.पो.नि. खरात ,पो.हे.कॉ.घंटे,पो.ना.आटपाडकर हे तात्काळ कारवाईसाठी गेले असता त्यांना नदीपात्राकडुन एक पांढ-या रंगाचे टाटा 207 कंपणीचे पिकअप येत असलेला दिसला.पोलीस असल्याचा संशय आल्याने त्याने पिकअप न थांबवता जोरात पिकअप चालवुन पळुन जावु लागला त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटर सायकलवरून त्याचा पाठलाग सुरु केला असता तो पिकअप वेगाने जात असताना रस्त्यावरील खड्यावरून घसरून राम कृष्णा गडदे यांचे ऊसाच्या शेताचे कडेला पडला. त्यातील चालक हा पळुन जावु लागला त्यावेळी पोलिसांनी त्यास पाटलाग करून पकडले.सदर पिकअपच्या पाठीमागील हौदामध्ये पाहीले असता त्यामध्ये वाळु असल्याचे आढळून आले.सदर वाहन पोलिसांनी वाळूसह ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *