ताज्याघडामोडी

नारायण राणेंची छत्रपती संभाजी महाराजांची तुलना, शिवसेना आक्रमक, वैभव नाईकांकडून तक्रार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोकणातील भाजप नेते प्रमोद जठार यांनी नुकत्याच घडलेल्या राजकीय नाट्यादरम्यान नारायण राणे आणि छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना केली होती. याविरोधात आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत […]

ताज्याघडामोडी

“बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर”

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सामनाच्या अग्रलेखावरुन शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केलीय. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी राऊतांना केलाय.“मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते. माननीय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हॉटेल चालकाकडून खंडणी उकळणारा पोलीस अधिकारी निलंबित

पुण्यातील पिंपर-चिंचवड परिसरात एका हॉटेल चालकाकडून खंडणी उकळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही संबंधित अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकला होता. मात्र, त्यानंतरही या पोलीस अधिकाऱ्याचे गैरप्रकार सुरुच होते. अखेर त्याच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई झाली आहे. मिलन कुरकुटे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे सध्या शहर पोलीस आयुक्तालयात […]

ताज्याघडामोडी

व्हॉट्‌सऍपवरून करा व्हॅक्‍सिन स्लॉट बुक

आता व्हॉट्‌सऍपद्वारे लसीचे स्लॉट बुक करून तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळवू शकता. व्हॉट्‌सऍपचे नवीन फिचर मायगव्ह (एमवायजीओव्ही) करोना हेल्पडेस्कसह काम करेल. काही दिवसांपूर्वी व्हॉट्‌सऍपवर लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा फोन र्चूीें उीेपर कशश्रविशीज्ञ उहरींलीें वर +91-9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल. नंतर व्हॉट्‌सऍप उघडा आणि मायगव्ह करोना […]

ताज्याघडामोडी

राणेंना आता नाशिक पोलिसांची नोटीस; 2 सप्टेंबर रोजी द्यावी लागणार हजेरी

महाडच्या कोर्टाने काल जामीन मंजुर केल्यानंतरही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांना आता नाशिक पोलिसांनी नोटीस जारी केली असून त्यांना 2 सप्टेंबर रोजी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात नाशिक मध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने त्यांना ही नोटीस जारी करण्यात आली […]

ताज्याघडामोडी

भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी, ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांचं भाकित

भारतात आताच्या स्थितीत कोरोनाव्हायरसची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे.सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे तर नक्कीच नाही. असं भाकित ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांनी केलं आहे. ते आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॅडव्हान्सड् रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी प्रमुख आहेत. प्रसिद्ध जीवाणूतज्ञ डॉ. टी जॉन जेकब यांच्या भाकितामागे असलेला विश्वास हा सीएसआयआरच्या संशोधनातून सिद्ध झालेला आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाव्हायरसच्या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील 21 गावांत कडक लॉकडाऊन

प्रांताधिकारी गजानन गुरव यांची माहिती पंढरपूर, दि. 25 :- तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जाणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणाऱ्या 21 गावांत 14 दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण […]

ताज्याघडामोडी

केंद्रसरकाकडून उसाच्या एफआरपीत वाढ

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उसाचे शासकीय खरेदी मूल्य (FRP) वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. मोदी मंत्रिमंडळ आणि सीसीईएच्या बैठकीत उसाची एफआरपी (रास्त आणि मोबदला देणारी किंमत) सुमारे 5 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या प्रस्तावाला अखेर मोदी कॅबिनेटनं मंजुरी दिलीय. एफआरपी वाढल्याने साखरेचा एमएसपी आणि इथेनॉलची किंमत वाढवण्याचा मार्ग […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदेंसह सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर पंढरपूर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २३ ऑगस्ट रोजी महाड येथील पत्रकार परिषेदत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत काढलेल्या वादग्रस्त उद्गाराने काल संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या.राज्य भरात शिवसेनेकडून राणेंच्या विरोधात निषेध आंदोलने करण्यात आल्याचे दिसून आले.पंढरपूर शहरातही शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी चौक येथे नारायण राणेंच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सहभागी झालेले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूरातून वाळू भरून येणारे वाहन भोसे परिसरात येताच करकंब पोलिसांनी केली कारवाई

पंढरपूर कडून एक वाहन वाळू भरून भोसे हद्दीत येत असल्याची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक अशोक लेलँड वाहन अर्धब्रास वाळूसह ताब्यात घेत करकंब पोलीस ठाण्यात भादवि कलम 379, 34 व गौण खनिज कायदा 1978 सुधारीत कायदा 2015 चे कलम 4(1), 4(क)(1) नुसार कलम 21 अन्वये २ इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून या कारवाईत सदर […]