ताज्याघडामोडी

व्हॉट्‌सऍपवरून करा व्हॅक्‍सिन स्लॉट बुक

आता व्हॉट्‌सऍपद्वारे लसीचे स्लॉट बुक करून तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती मिळवू शकता. व्हॉट्‌सऍपचे नवीन फिचर मायगव्ह (एमवायजीओव्ही) करोना हेल्पडेस्कसह काम करेल. काही दिवसांपूर्वी व्हॉट्‌सऍपवर लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती.

बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा फोन र्चूीें उीेपर कशश्रविशीज्ञ उहरींलीें वर +91-9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल. नंतर व्हॉट्‌सऍप उघडा आणि मायगव्ह करोना हेल्पडेस्क संपर्क उघडा. आता बुक स्लॉट लिहून मेसेज करा. यानंतर तुमच्या मोबाइल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी येईल. तुम्हाला लसीकरण केंद्राचे स्थान, तारीख आणि नाव निवडण्याचा पर्याय दिसेल. तुमच्या पिन कोडनुसार जवळच्या लसीकरण केंद्रावर लसीसाठी स्लॉट बुक केले जाईल.

व्हॉट्‌सऍपवर लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमध्ये +91-9013151515 सेव्ह करा. त्यानंतर व्हॉट्‌सऍप उघडा. या क्रमांकावर ‘कोविड प्रमाणपत्र’ किंवा ‘प्रमाणपत्र डाउनलोड करा’ टाइप करून पाठवा. तुमच्या क्रमांकावर 6 अंकी ओटीपी येईल. आता चॅट मध्ये ओटीपी पाठवा. कोविन पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांची यादी त्या मोबाइल नंबरवरून दाखवली जाईल. कोणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे त्याचा अनुक्रमांक पाठवा. तुम्ही संदेश पाठवताच तुम्हाला लसीकरणाचे प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *