ताज्याघडामोडी

नॉन इंटरनेट युजर्ससाठी मोठी बातमी! आता विना इंटरनेटनेदेखील करता येणार पेमेंट

नवी दिल्ली : नुकतेच रिझर्व बँक ऑफ इंडिया(RBI)ने मॉनिटरी पॉलिसीमध्ये ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आरबीआयने ग्राहाकांसाठी विशेष सेवेची घोषणा केली आहे. ज्या माध्यमातून इंटरनेटचा वापर न करणारे ग्राहक देखील आता पेमेंट करू शकतील. आरबीआयचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी MPC ची बैठकीत झालेल्या निर्णयांबाबत माहिती दिली. देशभरात लागू होणार पेमेंट सुविधा रिझर्व बँक ऑफ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गाडीस कट मारल्याच्या कारणावरून पंढपुरात दुकानदारास मारहाण

पंढरपूर शहरातील नवीपेठ येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार दिपक नागनाथ घोडके हे रात्री ९ वाजता आपले दुकान बंद करून भुवनेश्वरी मंदिराजवळ कासेगाव रोड येथील आपल्या घरी मोटारसायकल वरून परतत असताना अशोक लेलॅंड कंपनीचा बिगर नंबरचा  मिनी ट्रक चालक दुकानदार दिपक नागनाथ घोडके यांना ओव्हरटेक करून पुढे आला.त्यावेळी किन्नर साईडला बसलेल्या इसमाने आमच्या ट्रकला कट का मारला असे म्हणत गाडी […]

ताज्याघडामोडी

भीमा नदीकाठच्या लोकांना पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयाकडून सतर्कतेचा इशारा

पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे उजनी धरणात दौण्डहून येणाऱ्या निसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज वर्तविला असून त्यामुळे उजनी धरण व्यस्थापन सतर्क झाले आहे.आज रात्री ९ वाजता उजनी धरणातून ५ हजार क्युसेक्स वेगाने […]

ताज्याघडामोडी

पंढरीतून भाजप ओबीसी जागर अभियान सुरू

पंढरपूर- दोन वर्षापासून या सरकारने ओबीसी समाजाचा एम्पिरीकल डाटा गोळा केला नाही पण वसुली केली आहे. यामुळे आज आपले राजकीय आरक्षण रद्द झाले असून येत्या डिसेंबर पर्यंत हा डाटा गोळा न केल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार योगेश टिळेकर यांनी दिला.  ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे […]

ताज्याघडामोडी

‘शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात, लवकरच सत्ता बदलणार’, भाजप नेत्याच्या वक्यव्याने राजकीय खळबळ

राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप असा वाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळतो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत घरोबा केला असला तरी आता या पक्षांमध्ये फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे बारा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याला केल्यामुळे एकच राजकीय खळबळ उडाली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बारा दिवसांच्या अंतरात दोन सख्ख्या भावांची आत्महत्या, संगमेश्वरमध्ये खळबळ

संगमेश्वर तालुक्यातील खाडीभागात परचुरी गावात 12 दिवसाच्या अंतरात एकाच घरातील दोन सख्ख्या भावांनी गळफास घेत आत्महत्या करत जीवन संपवल्याने संपूर्ण खाडीपरिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एकाच घरात पाठोपाठ झालेल्या दोन तरुणांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहे. या आत्महत्यांनंतर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रियकरासोबत उभ्या असलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

राज्यात कितीही जनजागृती केली, कितीही कठोर कायदे केले तरी महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाही. राज्यात रोज अनेक महिला अत्याचाराच्या, लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. नागपूरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये […]

ताज्याघडामोडी

भाजपच्या राज्यव्यापी ओबीसी जागर अभियानाचा उद्या पंढरपूरातून प्रारंभ

राज्यातील कांग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारची 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाबद्दल असलेली उदासीन भूमिका,भारतीय जनता पक्षानी आपल्या सरकारच्या कार्यकाळात ओबीसी हितार्थ घेतलेल्या निर्णयाची माहिती ओबीसी समाजाला व्हावी व राज्य सरकारणी आपल्या नाकर्तेपनामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाशी विश्वासघात केला इत्यादी ओबीसी समाजाच्या हिताचे अनेक विषय घेवून भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने 9 ऑक्टोबर ते 20 […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी राज्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र मुंबईसह राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परतीचा पाऊस असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार […]

ताज्याघडामोडी

अजित पवारांना धक्का! पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

राष्ट्रवादी आणि अजित पवारांशी संबंधित असलेल्या विविध कारखान्यांवर त्याचबरोबर त्यांच्या स्वकियांच्या संस्थांवर गुरूवार सकाळपासूनच आयकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता आज सकाळपासून राज्यातील वातावरण तापलेलं दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सुपुत्र पार्थ पवारांच्या मुंबई कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळपासून अजित […]