ताज्याघडामोडी

अजित पवारांना धक्का! पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

राष्ट्रवादी आणि अजित पवारांशी संबंधित असलेल्या विविध कारखान्यांवर त्याचबरोबर त्यांच्या स्वकियांच्या संस्थांवर गुरूवार सकाळपासूनच आयकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

त्यामुळे आता आज सकाळपासून राज्यातील वातावरण तापलेलं दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सुपुत्र पार्थ पवारांच्या मुंबई कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे.

आज सकाळपासून अजित पवार आयकर विभागाच्या रडारवर आहेत. अजित पवारांच्या तीन बहिणींच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या मुंबई कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. पार्थ पवार यांच्या मुंबईच्या नरिमन पाॅईंटमधील कार्यालयावर छारेमारी केली आहे.

आयकर विभागाकडून पार्थ पवार यांचे कार्यालय, शिवालिक ग्रुप, चोरडिया, डीबी रियालटी, विवेक जाधव यांच्या घरी छापे टाकण्यात आहेत. त्यामुळे आता ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार आणि नेत्यांविरूद्ध कटकारस्थान करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

दरम्यान, पुण्यातील दौंड येथील साखर कारखाना, अहमदनगरमधील अंबालिका, सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना या ठिकाणी आयकर विभागाची कारवाई सध्या सुरू आहे. त्यामुळे आता येत्या काळात राजकारण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *