गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गाडीस कट मारल्याच्या कारणावरून पंढपुरात दुकानदारास मारहाण

पंढरपूर शहरातील नवीपेठ येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार दिपक नागनाथ घोडके हे रात्री ९ वाजता आपले दुकान बंद करून भुवनेश्वरी मंदिराजवळ कासेगाव रोड येथील आपल्या घरी मोटारसायकल वरून परतत असताना अशोक लेलॅंड कंपनीचा बिगर नंबरचा  मिनी ट्रक चालक दुकानदार दिपक नागनाथ घोडके यांना ओव्हरटेक करून पुढे आला.त्यावेळी किन्नर साईडला बसलेल्या इसमाने आमच्या ट्रकला कट का मारला असे म्हणत गाडी उभा केली.

गाडीतून खाली उतरत पाठीत व उजव्या बरगडीवर विटेने जोराने मारहाण केली.तर यावेळी सोबत असेल्या दुसऱ्या गाडीतून आलेल्या इसमानीही विटेने व कड्याने मारहाण केली अशा आशयाची फिर्याद दिपक नागनाथ घोडके यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ४ व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून मारहाण करणा-या अशोक लेलंड मिनी ट्रक मधील इसम हे 20 ते 25 वयोगटातील सावळे रंगाचे त्यांची उंची साधारण साडेपाच फुट असावी त्याना दाखवल्यास मी ओळखू शकतो अशी माहिती फिर्यादीने फिर्यादीत दिली आहे.फिर्यादीने कट मारलेला नसताना बिगर नंबरच्या वाहनातून आलेल्या व्यक्तीकडून मारहाण केली गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *