पंढरपूर शहरातील पुंडलिक परिसरात सुरेश गंगाधर दर्शने हे कुटुंबासह वास्तव्यास असून दिनांक 16/10/2021रोजी ते सहकुटुंब सातारा येथे आपली मुलगी सुप्रिया प्रसाद पेठकर हिचेकडे गेले असताना दि-16/10/2021रोजी सकाऴी 10/00वा ते दि 24/10/2021रोजी सायंकाऴी 06/30 वा चे दरम्यान दर्शने यांच्या घराचा कांडीकोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यानी अर्बन बँकेच्या दोन एफ डी ची कागदपञे व पासबुक यासह दोन […]
ताज्याघडामोडी
भीमा नदीतून गौण खनिजाची चोरी,पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई करत टिपर घेतला ताब्यात
पंढरपूर शहर हद्दीतील भिमा नदी पात्रातुन मरळ मातीचा चोरुन उपसा करुन वाहतूक करणाऱ्या टिपरवर शहर पोलिसांनी कारवाई केली असून या घटनेत पांढऱ्या रंगाचा टिपर रजि. क्र. डब्ल्यु. बी. 33 सी 8287 च्या सहाय्याने अवैद्यरित्या वाहतुक करत असल्याचे आढळून आल्याने मातीसह ताब्यात घेण्यात आला आहे. सदर प्रकरणी इसम नामे 1) जयराम चिमाजी जाधव, वय 32 वर्षे, रा. […]
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल आठ एकर श्रेत्रातील ऊस जळून खाक
शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल आठ एकर श्रेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यात घडली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ऊस पिकासह ठिबक पाईपही जळून खाक झाले आहेत. आशाबाई बाळासाहेब गाडेकर आणि गजानन बाळासाहेब गाडेकर यांचा कळमनुरी तालुक्यात आठ एकर ऊस होता. ऊस उत्पादनातून गाडेकर यांच्या कुटुंबियांना अंदाजे १२ लाख रुपयापर्यंत उत्पादन हाती येण्याची आशा […]
अखेर मान्सूनने देशातून घेतला निरोप, भारतीय हवामान विभागाची घोषणा
मागील काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. आज 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच मान्सून इतके […]
विम्याच्या रकमेसाठी मनोरुग्णाचा साप चावल्याने मृत्यूचा बनाव
अहमदनगर : 37 कोटी रुपयांचा इन्शुरन्स मिळवण्यासाठी चक्क एका मनोरुग्णाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोरुग्णांचा खून करून स्वतःचा मृत्यू दखवण्यासाठी ही हत्या करण्यात आलीय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आलंय. 37 कोटी रुपये मिळावेत म्हणून खून पैसे मिळवण्यासाठी कोण काय करेल आणि […]
नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी, घरातील नोकर झोपले असताना चोरट्यांनी 32 लाखांचे दागिने लांबवले
नागपुरात प्रसिद्ध नगरसेवकाच्या घरी चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी जवळपास 32 लाख रुपयांचे मौल्यवान दागिने लांबविले आहेत. विशेष म्हणजे घरात नोकरचाकर आणि इतर कुटुंबिय असताना चोरट्यांनी एवढ्या मोठ्या रकमेची धाडसी चोरी केली आहे. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीच्या घरात चोरी होऊ शकते तर मग सर्वसामान्यांचं काय? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला […]
एसटीची 17.17 टक्के भाडेवाढ; 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून होणार लागू, तिकिटात किमान 5 रूपयांची वाढ
इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून […]
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी न दिल्यास राज्यात उग्र आंदोलन छेडणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे मनसेच्या पहिल्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या ऊस परिषदेचे मनसेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी द्यावी, पहिलि एकरकमी उचल तीन हजार तीनशे रुपये द्यावा, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा […]
“समीर वानखेडे जन्मापासून आजपर्यंत मुस्लिमच,” नवाब मलिकांच्या नव्या दाव्यांमुळे खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील नव्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. ‘पहचान कौन’ असं म्हणत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. तर दुसरीकडे जन्मदाखल्याचा फोटो शेअर केला असून इथूनच घोटाळा सुरु झाल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. […]
बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी ५ हजार रुपये मिळणार
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये देणार असल्याचे घोषणा ना. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनाच्या वतीने मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासमोर बोलताना त्यांनी हि घोषणा केली. महाराष्ट्रातल्या बांधकाम कर्मचाऱ्यांना यापूर्वी कामगार कल्याण मंत्री असताना मोठ्या प्रमाणात सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता. […]











