८ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपुरात आले.पालखी मार्गाचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्याने माझ्यासह बहुतांश पंढरपूरकर समाधानी झाले. पंढरीची वारी आहे माझ्या घरी । आणिक न करि तीर्थव्रत ।। या संत तुकोबारायांच्या अभंगाला पिढ्यान पिढ्या प्रमाण मानत विठुरायाच्या वारीने समाधान पदरात पाडून घेणाऱ्या भाविकांचा पंढरपूरकडे येणार मार्ग सुखकर झाला याचा मलाही अतिशय आनंद वाटतो.अशातच […]
ताज्याघडामोडी
लग्न दुसरीकडे ठरवलं म्हणून प्रियकराचा प्रेयसीवर गोळीबार; स्वत:लाही संपवलं !
एकतर्फी प्रेमप्रकरणामध्ये मुलीने आपल्याला नाकारत दुसऱ्या मुलाशी लग्न का ठरवले या रागातून ऐका माथेफिरु प्रियकराने चक्क प्रेम करणाऱ्या मुलीवरती गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा विक्की आणि पीडीत मुलगी हे दोघे एकमेकांचे नातेवाईक होते. मुलाचं पीडीत मुलीवरती प्रेम होतं मात्र यांच लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरल्यामुळे विक्की नाराज होता आणि या नाराजीतूनच त्यांनी हे […]
रुग्णांनाही बसणार महागाईची झळ, औषधांच्या किंमती 40 टक्क्यांनी महागल्या
ह्रदयरोग आणि मधुमेहावरील औषधांच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झालीय. यासोबतच प्रतिजैविक औषधं तसंच टॉनिक आणि खोकल्याच्या औषधांच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्यानं रुग्णांना त्याचा फटका बसतोय. कोरोना व्हायरसमुळे औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक पुरवठा साखळीत अडथळा आला आहे. त्यामुळे भारतात पॅरासिटामॉलसह पेनकिलर, अँटीइन्फेक्टीव्ह, कार्डियाक आणि अँटीबायोटिक्ससह अत्यावश्यक औषधांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्यात. ज्याला औषधी क्षेत्रात सक्रिय […]
मानेवरच्या उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात, जनतेला केले आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी मानेवरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात तीन दिवस उपचार होणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक पत्रक सादर करण्यात आले असून त्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला एक आवाहन केले आहे. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू […]
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे. ७ नोव्हेंबरला कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, तर राज्यातील अनेक काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले […]
अबब..कायदेशीर उत्पन्नापेक्षा नगराध्यक्षाकडे आढळली कोटयवधींची मालमत्ता
पैशाच्या बळावर राजकरणात दबदबा वाढवीत सत्तेतील महत्वपूर्ण पदे पदरात पाडून घेत या पदाच्या माध्यमातून अफाट माया गोळा करायची,बहुमताच्या जोरावर आणि साम,दाम,दंड,भेद याचा वापर करत बोगस टेंडर,अंदाजपञक फुगवलेले विविध खऱ्या अथवा खोट्या कामाचे टेंडर काढायचे आणि वर्षाकाठी लाखो रुपये कमवत स्थावर,जंगम मालमत्ता वाढवीत न्यायच्या असा प्रकार राज्यातील अनेक नगर पालिकांमध्ये होत असल्याचा आरोप होताना दिसून येतो.मात्र […]
राज्यातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या व प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. तर, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटी वाहतुक ठप्प झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका […]
”सगळ्यात भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक,तुम्हाला कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही !”
मुख्यमंत्र्यांकडे आमदाराविरोधात तक्रार शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांच्या बाबतीत औरंगाबाद शहरात झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना बोलताना ‘एक लक्षात ठेवा, सगळ्यात भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक. तुम्हाला तो कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही. तो तुमचे ऐकतो असे दाखवतो, मात्र बाहेर गेल्यास सरपंचांच्या सांगण्यावरून केले असे सांगत स्वतःच्या अंगावर काही येऊ देत नाही.’ […]
प्रेयसीने मानसिक त्रास देऊन ५ लाखाला लुबाडले
प्रियकर पैशांची मागणी पूर्ण करत नसल्याचा राग येऊन प्रेयसीने ऐन दिवाळीत आपल्याच हाताने विष पाजल्याची घटना जालन्यात घडली आहे. विष पोटात गेल्याने चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या प्रियकराने शुद्धीवर आल्यानंतर या संदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रेयसी महिलेविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी पोलिसांनी […]
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक लांबणीवर
भारतीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यकाळ संपुष्ठात येत असला तरी सोलापूर आणि अहमदनगर वगळता मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे नंदुरबार, अकोला बुलडाणा वाशिम, नागपूर, या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया […]











