उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे सरकार असताना मंत्री राहिलेले गायत्री प्रसाद प्रजापती यांच्यासह तिघांना अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोन दिवसांपूर्वीच एमपी-एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पवन कुमार राय यांनी गायत्री प्रजापती यांच्यासह तीन आरोपींना या प्रकरणी दोषी ठरवले होते. आज या प्रकरणी न्यायालयाने सर्व दोषींना शिक्षा सुनावली. तसेच तिघांना 2 लाखांचा दंडही […]
ताज्याघडामोडी
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न प्रशासन सतर्क
हॉटेल, पेढे विक्रेते, मिठाई विक्रेते, चुरमुरे भत्ता विक्रेते, मेवा मिठाई विक्रेते, अस्थायी स्टॉल होल्डर या प्रामुख्याने वारी काळात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. तसेच भाविकांची वर्दळ असलेले भाग मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक, स्टेशन रोड, भक्त निवास, गजानन महाराज मठ सरगम चौक, कॉलेज चौक येथील किरकोळ विक्रेते व मोठे हॉटेल्स यांची सुद्धा […]
पत्नीचा पाठलाग करत भररस्त्यात केले सपासप वार; थरारक घटना!
पत्नी आपल्याशी बोलत नाही, या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं पत्नीचा पाठलाग करत तिला, भररस्त्यात अडवलं, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिने बोलण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीनं पीडितेवर धारदार चाकूने सपासप वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की यामध्ये 21 वर्षीय पत्नी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यातच […]
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाचा दिलासा, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार
परीक्षा दिलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. तसा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परीक्षा शुल्क परताव्यासाठी विद्यार्थ्यांच्या नोंदी बोर्डाने दिलेल्या वेबसाईटवर नोंदवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परिपत्रक काढून राज्यातील शाळा […]
काँग्रेस आमदाराच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, घटनेने खळबळ
मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या अल्पवयीन मुलाने स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आमदार पुत्राला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आमदाराच्या घरातच त्यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडली. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. बरगी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय यादव यांचं हाथी ताल कॉलनीत […]
औरंगाबादमध्ये पद्माकर मुळेंच्या कार्यालयावर ईडीचा छापा
औरंगाबाद शहरात आज बड्या उद्योजकांविरोधात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने एकापाठोपाठ एक असे छापे टाकले आहेत. आतापर्यंत नेमक्या कोणत्या उद्योजकांवर ही कारवाई सुरु आहे, हे गोपनीय होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर ईडीची रेड पडल्याचा खुलासा झाला आहे. औरंगाबाद शहरात आज बड्या उद्योजकांविरोधात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने (ED Raid) एकापाठोपाठ एक […]
अल्पवयीन प्रेमीयुगलाची आत्महत्या, तासाभराच्या अंतराने केले विष प्राशन; धक्कादायक घटना
अल्पवयीन युवक आणि युवतीने तासाभराच्या अंतराने विष प्रशान करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणातून या दोघांनी आत्महत्या केली असल्याचे बोलले जात असून पोलीस तपास करत आहे. कुंभार तांडा ता. जामनेर या भागात ही घटना घडली असून, 9 नोव्हेंबर रोजी दुपारच्या भरात आई-वडील शेतात गेल्यानंतर घरी कोणी नसताना 16 वर्षीय युवतीने विष प्राशन करत […]
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! मोदी सरकारने इथेनॉलच्या किमती प्रति लिटर 2.55 रुपयांनी वाढवल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने (CCEA) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होण्यासाठी इथेनॉलच्या किमती 80 पैशांपासून ते 2.55 रुपये प्रति लिटरने वाढवल्यात. त्यामुळे उसावर आधारित इथेनॉलची किंमत 62.65 रुपयांवरून 63.45 रुपये प्रतिलिटर होणार आहे. इथेनॉलच्या नवीन किमती 1 डिसेंबर 2021 पासून लागू […]
बचतगटांना सहकार्य करा अन्यथा शासना कडे प्रस्ताव पाठविणार -सिईओ दिलीप स्वामी
सोलापूर – बचत गटांनी बॅंकांनी सहकार्य करणे अपेक्षीत आहे. ज्या बॅंका सहकार्य करणार नाहीत त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणेत येईल. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागात आज महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत, जिल्हा अभियान कक्ष, उमेद चे जिल्ह्यास्तरावरील व तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात […]
विश्वास नांगरे पाटील यांच्या सासऱ्यांच्या विरोधात ईडीची कारवाई
राज्यात ईडीच्यावतीने पुन्हा कारवाईचा धडाका सुरु करण्यात आलेला आहे. दरम्यान ईडीच्यावतीने आज ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. दरम्यान औरंगाबाद येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास करणारे मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे पद्माकर मुळे हे सासरे आहेत. ईडीच्यावतीने आज […]











