राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतल्याने राजन साळवी यांना धमकीचा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’, असे सांगत राजन साळवी यांना धमकी देण्यात आली. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतल्याने […]
ताज्याघडामोडी
एसटीची कर्मचाऱ्यांचा संप मिटेपर्यंत भाजपा आंदोलकांना शिधा पुरवणार – चंद्रकांत पाटील
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांची चुल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी आज चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांनी भेट दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधा वाटप करण्यात आला. हा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील […]
बसच्या धडकेतून स्कूटर चालक थोडक्यात बचावला
नुकतेच कर्नाटकातील मंगलोर येथे असेच काहीसे पाहायला मिळाले . ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, भरधाव वेगाने स्कूटी चालवणारा तरुण बसला धडकल्यानंतर थोडक्यात बचावला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही क्षणभर घाबरू शकतो.मंगळुरूमधील एलियार पडवू रोडवर ही घटना घडली. कृपया लक्षात घ्या की हा रस्ता फारसा वर्दळीचा रस्ता […]
४५ दिवसांचं लग्न; Video Call करुन पत्नीनं संपवलं जीवन, पतीनंही उचललं टोकाचं पाऊल
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून लोकांचा संयम सुटत चालला असून खून आणि आत्महत्यासारख्या घटना घडत आहेत. लखनऊमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. जिथे हाताची नस कापून पत्नीनं पतीला व्हिडिओ कॉल केला, तर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे 45 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं आणि फोनवर वाद झाला असता पत्नीनं हाताची […]
एकाच घरात 3 वयोवृद्ध महिलांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ
दापोली तालुक्यातील वणौशी गावात एकाच घरात तीन वयोवृद्ध महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दागिन्यांसाठी या महिलांना जाळून मारल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे दापोली तालुक्यात संताप व्यक्त होत असून गुन्हेगारांना तात्काळ पकडावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दापोलीतील वणौशी तर्फे नातू खोतवाही गावातील बहुतांशी घरे बंद अवस्थेत आहेत. या गावातील कुटुंबे कामानिमित्त बाहेरगावी […]
राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर फडणवीसांनी केलेल्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश-गोव्यासह देशपातळीवरील निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यावरून भाजपाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने […]
MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या; फिजिकलमधून बाहेर पडल्यामुळं होता नैराश्यात
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणार्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत आज दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अमर मोहिते (वय ३१) असं या तरुणाचं नाव आहे. अमर हा मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील होता. त्याचा भाऊ पिंपरी चिंचवड पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. स्पर्धा […]
शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा घेतला चावा; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
येवला तालुक्यातील नगरसुल येथील शिक्षण प्रसारक मंडळच्या शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याचा चावा घेतला आहे. लहान मुलांचे भांडण आपण सर्वत्र एेकतो, पण, या शिक्षकांमधील हे लहान मुलांसारखे भांडण सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी हा चावा घेतला असून ब्रह्मचैतन्य राजगुरू असे शाळेतील उपशिक्षकाचे नाव आहे.शालेय कॅटलॉक संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकामध्ये सुरु झालेला हा […]
शिवसेनेच्या बैठकीत नुसता राडा, थेट आमदाराला खुर्ची फेकून मारली
पक्षाच्या ऑनलाइन बैठकीत तक्रार केल्यावरून शिवसेनेच्या दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये समोर आली असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू आहे. एवढंच नाहीतर शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुख व बाजार समितीचे माजी सभापतीने थेट आमदारालाच खुर्ची फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे शिवसेनेतील पक्षांतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा […]
मुख्यमंत्री महोदय आम्ही पंढरपूरकरांनी काय घोडं मारलंय ?
गोरगरिबांचा,मुबंईत मराठी बांधवाच्या हिताचे रक्षण करणारा पक्ष म्हणून शिवसेना संघटना पक्ष म्हणून वाटचाल करू लागली,मुंबई,ठाणे आणि मुंबई वासी कोकणी बांधवाच्या पाठबळावर मुंबई इलाख्यात आणि कोकणात पक्ष म्हणून पुढे आली.पुढे हिंदुत्वाचा साज चढवत राज्यात विस्तारत गेली.त्यामुळे अजूनही कुठलेही संस्थात्मक राजकारण,सहकारी संस्थांशी निगडित राजकारण आणि प्रस्थापतितांचे वारसा हक्काचे राजकारण यापासून दूर असलेला बहुतांश सामान्य मतदार शिवसेनेकडे आकृष्ट […]











