एक मद्यधुंद व्यक्ती ट्रेनमध्ये एका 30 वर्षीय महिलेची छेडछाड करत होता. यावेळी महिलेचा नऊ वर्षांचा मुलगाही तेथे उपस्थित होता. यावेळी या महिलेने त्या व्यक्तीस विरोध केल्यावर आरोपीने महिलेला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपीने देखील ट्रेनमधून उडी मारली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आरोपी जखमी झाला असून, […]
ताज्याघडामोडी
दुर्दैवी ! झोका खेळता खेळता फास लागून चिमुकल्याचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मामाच्या गावी आलेल्या पहिली इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा मुलगा आपल्या मामाच्या गावी आला होता. याठिकाणी झोका खेळता खेळता फास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुष्कर सुभाषराव पोटे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात […]
कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे 49 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुकयातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना 49 हजार वह्रयांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती उद्योग व व्यापार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दिली. पंढरपूर तालुक्यात सहकार, राजकीय, सामाजिक, […]
स्वेरीतील डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून स्वेरी अंतर्गत असलेल्या दोन्ही डी. फार्मसीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा या वर्षी देखील कायम राखली आहे. विशेष म्हणजे डी. फार्मसीच्या दोन्ही महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान विद्यार्थीनींनी मिळविला आहे. […]
KGF चित्रपट पाहूनच सायको किलरने केल्या 4 सुरक्षारक्षकांच्या हत्या
मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांची हत्या करणाऱ्या सायको किलरला पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून हत्या करणाऱ्या सायको किलरला ताब्यात घेण्यात आले आहे. भोपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक खून करण्यात आला होता. त्याच्या तपासासाठी संशयित आरोपीला अटक करून सागरला नेण्यात आले आहे. या हत्याप्रकरणी पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती देणार […]
अदार पूनावाला यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका; कोरोना लसीचा दुष्परिणाम झाल्याचा दावा
मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. स्नेहल लुनावत यांच्या मृत्यूबाबत वडील दिलीप लुनावत यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेतली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स, केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. कोविड लसीच्या दुष्परिणामांमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत दिलीप लुनावत यांनी मुलीच्या मृत्यूबद्दल 1000 कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी […]
प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवलं; आरोपी जेरबंद
रायगड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रियकराने विवाहित प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर प्रियकरानं प्रेयसीचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची बाब देखील उघड झाली आहे. दरम्यान या प्रकरणात प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील नवखार येथे राहणाऱ्या 22 वर्षीय विवाहित […]
शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्याची हत्या
मृतदेह तलावात फेकला अकोल्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात फेकून देण्यात आला होता. भागवत अजाबराव देशमुख (वय २८, राहणार कौलखेड, अकोला.) असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, हत्या करून भागवतचा मृतदेह तलावाच्या पाण्यात राहिल्याने त्याची […]
50 खोके महागाई वाढतेय एकदम ओके-श्रीकांत शिंदे
वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी युवकची पंढरपुरात तीव्र निदर्शने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सुरज चव्हाण यांच्या आदेशानुसार दि.1 सप्टेंबर रोजी वाढत्या महागाई विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने तहसील कार्यालय येथे महागाई,बेरोजगारी, ईडी च्या चुकीच्या धोरणाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. पंढरपूरचे […]
युटोपियनच्या प्रगतीत सांगोला तालुक्याचे योगदान मोलाचे – उमेश परिचारक
युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याच्या प्रगतीमध्ये सांगोला तालुक्यातील उस उत्पादक यांनी मोलाचे योगदान दिले असून पुढील काळात सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युटोपियन शुगर्स कायमच अग्रसेर राहणार असल्याने मत कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केले. युटोपियन शुगर्स च्या सांगोला येथील विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी परिचारक बोलत होते. यावेळी सदर कार्यक्रमासाठी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक , पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, मुख्य शेती […]











