ताज्याघडामोडी

युटोपियनच्या प्रगतीत सांगोला तालुक्याचे योगदान मोलाचे – उमेश परिचारक

युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याच्या प्रगतीमध्ये सांगोला तालुक्यातील उस उत्पादक यांनी मोलाचे योगदान दिले असून पुढील काळात सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युटोपियन शुगर्स कायमच अग्रसेर राहणार असल्याने मत कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केले. युटोपियन शुगर्स च्या सांगोला येथील विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी  परिचारक बोलत होते.

      यावेळी सदर कार्यक्रमासाठी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक , पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे जि.प. सदस्य अतुल पवार, शिवाजी पाटील, प्रगतशील बागायतदार रंगनाथ शेळके, हेमंत कुलकर्णी, विजयकुमार देशमुख, कल्याण नलवडे, यशवंत कारंडे तसेच सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक, करार केलेली सर्व तोडणी वाहतूक ठेकेदार, उपस्थित तसेच कारखान्याचे शेती विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, कायम दुष्काळी असा शिक्का असणार्‍या सांगोला तालुक्यात ऊसाचे कार्यक्षेत्र वाढत आहे ही समाधानकारक बाब आहे. सर्वत्र ऊसासाठी स्पर्धा आहे, मात्र, युटोपियन शुगर्स ने कारखान्याच्या उभारणी पासूनच उस उत्पादकांचा विश्वास संपादन केल्याने गतवर्षी 635000 मे.टन इतक्या ऊसाचे गाळप करून एक उंचांक प्रस्थापित केला आहे.

सांगोला भागातील ऊस उत्पादक त्यांच्या आग्रहानुसार त्यांच्यात भागात विभागीय कार्यालय सुरू करत आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून ऊस उत्पादक व वाहन मालक यांना योग्य त्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी जास्तीत-जास्त उस उत्पादक यांनी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या ऊसाची नोदं करून घ्यावी व जास्तीत जास्त गाळपासाठी युटोपीयन शुगर्स कडे पाठवावा असे अहवाहन परिचारक यांनी केले.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *