पुण्यात सलग चौथ्या दिवशी हत्येचा थरार दिसून आला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन दोन तरुणांनी एका महिलेची भररस्त्यात दिवसाढवळ्या हत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने परिचय असलेल्या एका तरुणावर गोळीबार केला आणि स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ज्या तरुणावर गोळीबार झाला […]
ताज्याघडामोडी
तिचा फोन आला म्हणून भेटायला गेला अन् गायब झाला, नंतर शेतात जे दिसलं ते पाहून सगळेच हादरले
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात अनैतिक संबंधांच्या कारणावरून जगेश्वर शर्मा नावाच्या व्यक्तीची गळा चिरून अत्यंत भीषण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. ही घटना बायसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मीनापूर पंचायतीतल्या फूलबासा गावातली आहे. मृताचं शिर मक्याच्या शेतात पुरलेलं आढळलं, तर त्याचं धड अद्याप सापडलेलंच नाही. त्याच शेतात त्या व्यक्तीच्या चपला आणि टोपी सापडली आहे. श्वानपथकाची मदत घेऊन बायसी […]
आई फोन घेईना, घरी येऊन पाहिलं तर दाराला कुलूप, चपलेवरुन संशय, दरवाजा उघडताच लेक हादरला
घटस्फोटाला आईच जबाबदार असल्याच्या कारणावरून मुलाने आईचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार खडकी परिसरात घडला. गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, रा. श्रीरामपूर, नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २९, रा. खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी आरोपी मुलाला अवघ्या काही तासांत शिर्डी परिसरातून ताब्यात घेतले. हा […]
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उभारण्यात आलेल्या फ्लेक्स फलकावर अज्ञात व्यक्तीनं शाईफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळं बारामतीमध्ये वातावरण तापलंय. अजित पवार यांच्या काऱ्हाटी येथील कार्यकर्त्यांनी आपल्या शेती फार्मवर सुनेत्रा पवार यांचा फ्लेक्स लावला होता. या फ्लेक्सवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनं शाईफेक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फलकावर शाई फेकल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक […]
दोघात उधारीचा वाद; भेटायला बोलवून तरुणाचा काढला काटा, रागात अल्पवयीन मुलाचं कृत्य
उधार घेतलेले ३ हजार ५०० रूपये परत न केल्याने एका अल्पवयीन मुलाने ३५ वर्षीय तरूणाची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना शहरातील गुरूनानक नगरातील आमदार संदीप धुर्वे यांच्या घराशेजारी ९ फेब्रुवारीला रा़त्रीच्या सुमारास घडली. सचीन सुखदेव माटे (३५) रा. गुरूनानक नगर, यवतमाळ असे मृत तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गुरूनानक नगरात सचीन माटे हा […]
पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत तर मला काय देशील? विद्यार्थिनीकडे भलतीच मागणी, ‘रयत’च्या प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा
बारावीच्या भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत २० पैकी २० गुण देण्यासाठी प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून रयत शिक्षण संस्थेच्या नगरमधील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश शिर्के असे त्या प्राध्यापकाचे नाव आहे. सध्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. त्या दरम्यान हा प्रकार झाला. त्या विद्यार्थिनीने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने प्राध्यापकाने […]
मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषण करणार; राज्य सरकारचं टेन्शन वाढणार
मनोज जरांगे पाटील आजपासून (१० फेब्रुवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. मात्र, सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी […]
पुण्याहून कराडला जाताना झोप लागली, उतरली मिरजेत; विवाहितेवर सामूहिक बलात्कार, कर्नाटकात विकले
एक झोपेची तरुणीला मोठी किंमत मोजावी लागली आहे. पुण्याहून कराडला आई वडिलांना भेटण्यासाठी निघालेल्या विवाहित तरुणीला रेल्वेत झोप लागली. तिला कराडला उतरायचं होतं, मात्र झोप लागल्यानं मिरजेला पोहोचली. लवकर गाडी नसल्याने ती रेल्वे जंगक्शनवर थांबली. त्यावेळी तिथे काही तरुणांनी तिला जबरस्तीने झुडपात ओढत नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणीला रेल्वे ब्रीजजवळील कामगाराच्या एका […]
वाळू माफियांची मुजोरी, थेट जिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; डोक्यावर रॉडने जबर मारहाण
वाळूमाफियांनी उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाटा ते नशिराबाद दरम्यान मंगळवारी (दि.६) मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक एका संशयितास नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, […]
प्रेयसीसोबत बर्थडे पार्टी, जंगलात केक कापला, गिफ्टच्या बहाण्याने केलं भयानक कांड
देशात प्रेमप्रकरणांमधून हत्या झाल्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. केवळ आकर्षणापोटी, पैशांसाठी किंवा इतर काही कारणांवरून या हत्या घडतात. झारखंडची राजधानी रांचीमध्येही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली. 3 फेब्रुवारीला प्रियकरानं प्रेयसीसोबत निर्घृण कृत्य केलं. त्यानंतर पोलीस चौकशीत सत्य उघड झालं. रांचीमधल्या मांडर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एका जंगलात प्रियकरानं प्रेयसीचा खून केला आणि पुरावे नाहीसे […]