पंढरपुर तालुक्यातील २२ गावे व मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब झालेअसल्यामुळे ग्रामस्थांची पावसाळयामध्ये गैरसोय होत होती. परंतु दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपुर मंगळवेढा मतदार संघामध्ये विकास कामे थांबली होती. व शासनाच्या विविध योजनांचा निधी ही मिळणे बंद झाले होते. भगिरथदादा भालके चेअरमन श्री विठठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर […]
ताज्याघडामोडी
पंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
पंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय पंढरपूर, दि. २३: कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूरला सुमारे दोनशे बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंढरपूर विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार यशवंत […]
ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु पालकमंत्री दत्तात्रय भरण यांची अकलूज येथे ग्वाही
ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु पालकमंत्री दत्तात्रय भरण यांची अकलूज येथे ग्वाही पंढरपूर, दि. 23 :- जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोना बाधितांवर उपचारसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यात कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजने […]
LPG कनेक्शनचे नियम बदलले! आता फक्त हा पुरावा द्या आणि सिलेंडर घ्या
मुंबई : तुम्ही घरघुती वापरासाठी LPG सिलेंडर वापरत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता फक्त एक अधिकृत पुरवा दाखवून तुम्हाला गॅस कनेक्शन घेता येईल. याआधी कोणताही पत्त्याचा पुरावा नसल्यास कनेक्शन मिळू शकत नव्हते. केंद्र सरकारची नवी योजना? केंद्र सरकारच्या मते, सरकार पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत दोन वर्षात 1 कोटीपेक्षा जास्त मोफत LPG सिलेंडर कनेक्शन देणार आहे. […]
‘भाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या’
मुंबई, 23 एप्रिल : ‘अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत,’ असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे. […]
मृत रुग्णाच्या बँक खात्यातून पैसे गायब; बोटाचे ठसे वापरुन वॉर्ड बॉयने केली चोरी
जालना, 23 एप्रिल: सध्या राज्यात कोरोना विषाणूची स्थिती हाताबाहेर जात आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होतं आहे. तर रुग्णांचे कुटुंबीय आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी हवे तेवढे पैसे मोजायला तयार होतं आहेत. अर्थातच याचा आर्थिक फटका रुग्णाच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे. अशी एकंदरित स्थिती असताना जालन्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका […]
राज्यात एसटी चालू राहणार, पण तुम्हाला प्रवास करता येणार का? जाणून घ्या
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा बुधवारी करण्यात आलीय. राज्याच्या मुख्य सचिवांनी त्याबाबत एक परिपत्रक काढून गुरुवारी म्हणजे आज रात्रीपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याची माहिती दिलीय. त्यासाठी कठोर नियमावलीही तयार करण्यात आलीय. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीबद्दल कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात आता एसटी महामंडळासाठी एक नियमावली परिवहन […]
ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या सूचना
ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या सूचना पंढरपूर, दि. २२ :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णांलयात डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. या रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासू यासाठी वितराकांनी पुरवठा सुरळीत राहील याची […]
तुमच्या पाया पडतो,हात जोडतो आता तरी मदत करा !
राज्यातील रोज वाढणारी कोरोना बाधितांची संख्या,ऑक्सिजन अभावी तडफडून मरत असलेले रुग्ण,रेमिडिसीवीर चा तुडवडा आणि केंद्राचे असहकार्य यामुळे राज्यातील परिस्थिती आता हाताबाहेर चालली असल्याचे दिसून येत असुन गेल्या वर्षभरापासून अतिशय धैर्याने परिस्थिती हाताळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता केंद्राला आर्त विनवणी केली असून तुमच्या पाया पडतो,हात जोडतो पण कबूल केल्याप्रमाणे २६ हजार रेमिडीसीवर इंजेक्शन तातडीने द्या […]
भारताचा एका दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा जागतिक विक्रम
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत जगभरातील सर्वाधिक रुग्ण एकट्या भारतात आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णसंख्येने जगभरातील सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आज ३ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख १४ हजार ८३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २०१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ […]