ताज्याघडामोडी

दुसरं लग्न करून संसारात रमला; तेवढ्यातच पहिल्या बायकोने सतत केली एकच मागणी; वैतागून पती नको ते करून बसला…

जिल्ह्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्ह्यांचा यशस्वी तपास कौतुकास्पद आहे. सुधागड पाली येथे कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळाला होता. या प्रकरणी तपास सुरू होता. आता या तपासाला पुर्णविराम मिळाला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. हा अपघात नसून घात असल्याचे तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील सुधागडमधील नवघर ग्रामपंचायत […]

ताज्याघडामोडी

राज्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, मुंबई, पुण्यासह ११ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

दोन दिवस दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह राज्यतील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाची रिपरीप पाहायला मिळते. इतकंच नाहीतर हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांसाठी राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचा पाऊस पडेल […]

ताज्याघडामोडी

दोन मुलींनंतर तिसरीही लेकच झाली, बापाने आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबली अन्….

आधी दोन मुली, त्यात तिसरीही मुलगी झाल्याच्या रागातून बापानेच त्याच्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली. संतापजनक कृ्त्य म्हणजे, त्याने तिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट देखील लावली. हा धक्कादायक प्रकार जळगावातील जामनेर तालुक्यातील हरिहर तांडा या गावात काल मंगळवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून […]

ताज्याघडामोडी

मराठा समाजाची साधी, सरळ, सोपी गोष्ट अवघड करून ठेवली; बच्चू कडू यांचा हल्लाबोल

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे वातावरण तापले आहे. याबाबत अनेक नेते आणि पक्ष प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याबाबत आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया देत मिंधे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची साधी, सरळ, सोपी गोष्ट होती; ती आता अवघड करून ठेवली गेली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या किंवा ओबीसी म्हणून द्या नाही तर कुणबी […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड मध्ये “वैश्विक मानवीय मुल्य” या विषयावर तीन दिवशीय कार्यशाळा संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी  कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात दिनांक ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ए आय सी टी मान्यता प्राप्त “वैश्विक मानवीय मुल्य” या विषयावर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हि कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.या कार्यशाळेस प्रमुख […]

ताज्याघडामोडी

घरात घुसून भांडले, बाहेर नेत चिंचेच्या झाडाखाली रचला रक्तरंजित खेळ; आधी सपासप वार अन् नंतर…

दिंडोरी तालुक्यात असलेल्या वणी खेडले येथे किरकोळ वादातून एकाचा खून करून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिडोंरी तालुक्यातील खेडले येथे संदिप हरी मेधने (४१) यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी किरण शरद कदम (रा. कोर्हाटे) आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीविरोधात वणी पोलीस […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मेकअप आर्टिस्टचा लिव्ह इन पार्टनरकडून खून; सुटकेसमध्ये मृतदेह भरुन गुजरातमध्ये फेकला

चित्रपटसृष्टीत मेकअप आर्टीस्ट असलेल्या तरुणीचा तिच्या लिव्ह इन पार्टनरनं त्याच्या पत्नीसोबत मिळून खून केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. नेना महत असं खून झालेल्या मेक अप आर्टीस्टचं नाव आहे. तर मनोहर शुक्ला असं मारेकरी लिव्ह इन पार्टनरचं नाव आहे. नायगावात खून केल्यानंतर या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन मारेकऱ्यांनी गुजरातमधील वापी परिसरात फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गवंडी कामाचे पैसे अडकले होते; मजुरी मागण्यासाठी गेला, मालकाला आला राग, अन् चौघांनी घडवलं धक्कादायक कृत्य

गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात चौघांनी एका मजुराला लाथा बुक्क्यांनी, दगड आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव गाव येथील कमानीजवळ घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिपक दादा गांगुर्डे (४०) असे मयत मजुराचे नाव […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत पुन्हा पाऊस बरसणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने सप्टेंबरमध्ये जोरदार पुनरागमन केलं. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा राज्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाऊस कधी परतणार? असा प्रश्न बळीराजाला पडलाय. अशातच हवामान खात्याने राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या गुरूवारपासून राज्यात पुन्हा […]

ताज्याघडामोडी

आरोपीचा मृतदेह कोपर्डीत आणण्यास गावकऱ्यांचा विरोध; पुण्यात केले अंत्यसंस्कार

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील पप्पू शिंदे या आरोपीने पुण्यातील येरवडा कारागृहात रविवारी आत्महत्या केली होती. तर नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेवर पुण्यातील कैलास स्मशानभूमीत मध्यरात्री उशिरा अंत्यसंस्कार […]