गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘आईनं मला बाथरूममध्ये कोंडलं अन्..’ त्या दिवशी काय घडलं? पतीची हत्या करणाऱ्या शिक्षिकेची पोलखोल

यूपीच्या कानपूरमध्ये 45 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक सरकारी शिक्षक राजेश गौतम यांची शिक्षक पत्नी पिंकीने हत्या केली होती. पिंकीचे एका मिस्त्रीसोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. पोलिसांनी शिक्षक राजेश गौतम यांच्या मुलाशी बोलून या घटनेची माहिती घेतली. यामध्ये राजेशच्या मुलाने पोलिसांना सांगितलं आहे की, घटनेच्या दिवशी तोही वडिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी जात होता, मात्र त्याच्या आईने त्याला घरातील बाथरूममध्ये कोंडून ठेवलं.

शिक्षक राजेश गौतम यांनी 2021 मध्ये कानपूरमधील कोयला नगर येथील त्यांच्या प्लॉटवर बांधकाम सुरू केलं होतं. यासाठी राजेशने सुतारकामाच्या व्यवसायातल्या शैलेंद्र सोनकर याला कामावर ठेवलं होतं. बांधकामाच्या संदर्भात शैलेंद्रलाही राजेशच्या घरी जावं लागायचं. यावेळी त्याची राजेशची पत्नी पिंकी हिच्याशी भेट झाली. पिंकी दिसायला सुंदर होती, तिने बी.एड. केलं होतं. शैलेंद्रला पिंकी आवडू लागली. त्याचे हावभाव पाहून पिंकीला हे समजलं. हळूहळू पिंकीनेही शैलेंद्रसोबत बोलायला सुरुवात केली आणि दोघांचं अफेअर सुरू झालं.

शैलेंद्र सोनकर हा अनेकदा राजेशच्या अनुपस्थितीत पिंकीच्या घरी जायचा. राजेशला हा प्रकार कळताच त्याने शैलेंद्रला घरात येण्यास मनाई केली. हे पाहून राजेशची पत्नी पिंकी भडकली. या अवैध संबंधावरून पिंकी आणि राजेशमध्ये वारंवार भांडणे होत होती. वाद वाढत गेल्यावर पिंकीने शैलेंद्रसोबत मिळून राजेशला मार्गातून हटवण्याचा कट रचला.

यानंतर पिंकीने एकदा राजेशला जेवणात विष दिलं, मात्र रुग्णालयात उपचारानंतर राजेशचा जीव वाचला. यानंतर पिंकीने राजेशच्या हत्येची सुपारीही दिला होती, मात्र त्यावेळी सुपारी घेणारा पैसे घेऊन पळून गेला होता. यावेळी पिंकीने शैलेंद्रसह मिळून राजेशच्या हत्येची सुपारी चार लाख रुपयांना दिली. पिंकीने राजेशची हत्या अपघात वाटावा असा कट रचला, जेणेकरून राजेशच्या नावावर तीन कोटी रुपयांचा विमा क्लेम मिळेल. सरकारी शिक्षक असण्यासोबतच राजेश प्रॉपर्टीचं कामही करायचे.

4 नोव्हेंबरला राजेश घरातून फिरायला निघाला असताना शैलेंद्र आणि सुपारी घेणाऱ्यांनी त्यांना त्यांच्या कारने चिरडलं. पोलीस हे प्रकरण अपघात मानत होते, मात्र राजेशच्या भावाने पोलिसांना हत्येची माहिती दिली. यानंतर एक सीसीटीव्ही आढळून आला, ज्यामध्ये राजेशला चिरडणारी कार त्याचा पाठलाग करताना दिसत होती. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *