पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिक मध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. याप्रकरणी आता […]
ताज्याघडामोडी
संभाजीराजेंना गाभाऱ्यात जाण्यास रोखले; तुळजापूर आज कडकडीत बंद
तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीराजे भोसले यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर संभाजीराजेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून सुनावलं होतं. या घटनेमुळे संभाजीराजे यांचा अपमान झाल्याचं म्हणत मराठा क्रांती ठोक मोर्चानं संताप व्यक्त केला. मंदिर व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी आता तुळजापूरमध्ये १०० टक्के बंद पाळण्यात आला आहे. […]
मिटकरींच्या वक्तव्याबाबत पंधरा दिवसात उचित कारवाई करा, राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या सभेत कन्यादानाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत पंधरा दिवसात योग्य ती कारवाई करून त्याबाबत आम्हाला माहिती द्या, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. सांगलीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादानाविषयी वक्तव्य केले होते. कन्यादानाच्या वेळी मम भार्या समर्पयामि म्हणत भटजी माझी बायको […]
मांजर समजून बिबट्याच्या बछड्यासह खेळत होते चिमुकले; 8 दिवस घरच्यांनीही केला सांभाळ पण नंतर…
वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही, अशी एक बातमी समोर आली आहे. तुम्ही कधी कल्पना केली आहे का, मांजर, कुत्रा नाही तर थेट बिबट्याचा बछडा तुमच्या घरी राहतोय. घरचे सर्व त्याला खूप प्रेम करताय. त्याच्या सर्वांशी खूप गट्टी जमली आहे, नाही ना. पण हे खरं आहे. वाचून तुम्हाला धक्का बसेल. पण हो, ही घटना मालेगावच्या मोरदर […]
ऊसाच्या फडाला पेटवून देत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या, गेवराई तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आता पेटू लागला आहे. गळीत हंगाम संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना बीड जिल्ह्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. अनेक प्रयत्न करूनही आपला ऊस गाळपासाठी जात नसल्याने नैराश्यग्रस्त एका 35 वर्षीय शेतकऱ्याने उभ्या ऊसाच्या फडाला आग लावून ऊसाची फडातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यात […]
2 वर्षांचा चिमुकला कुत्र्यासारखा भुंकतोय; घटना वाचून तुम्हालाही धक्का बसेल
माणूस जेव्हा जनावर बनतो तेव्हा काय होतं याची कल्पना न केलेली बरी. पोटच्या मुलला एका खोलीत त्याच्याच आई वडिलांनी दोन वर्ष बंद केलं होतं. नुसतं बंदच केलं नाही तर सोबत 22 रानटी कुत्री सुद्धा ठेवली होती. खेळण्या बागडण्याच्या वयात चिमुकला माणूसपण हिरावून बसला. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच खोलीत बंद असल्याने आणि सोबतच्या कुत्र्यांमुळे तो […]
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी 5 जूनला मतदान
पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी […]
मनसे प्रमुख राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला आहे. उर्दू शब्दांचा वापर धमकीच्या पत्रामध्ये करण्यात आल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी […]
ग्रामसेवक, ग्रामविकास पदे रद्द होणार! राज्य सरकारने नेमली समिती
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून होत होती. त्यानुसार राज्य सरकारनेही ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. याविषयीची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ही समिती संबंधित पद निर्माण करण्याची आकश्यकता […]
तुळजाभवानी मंदिरात संभाजीराजेंचा अवमान, गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले
भाजपचे खासदार संभाजीराजे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात गेले असता गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारमुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी असल्याने छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य नेहमी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. तुळजाभवानी मंदिरात आल्यानंतर ते नेहमी थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे […]











