गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरण; रुबी हॉल क्लिनिकच्या डॉ. परवेज ग्रँटसह 15 जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिक मध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची कात्री केली नाही आणि आपली दिशाभूल करत किडनी बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणी रुबी क्लिनिकमधील 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किडनी रॅकेटचा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनने पर्दाफाश केला. रुबी क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली असल्याचा आरोप आहे.

एका महिलेला 15 लाख रुपयांचे आणिष दाखवत किडनी प्रत्यारोपण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा उलगडा मार्च महिन्यात झाला होता. आता या प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेज ग्रँट आणि कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांच्यासह एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील मोठ्या आणि प्रतिष्ठीत अशा रुबी हॉल क्लिनिकमधील घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता रुबी हॉल क्लिनिकची प्रतिक्रिया आली असून त्यांनी आपल्या डॉक्टरांवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *