बुलढाणा जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नांदुरा येथे दुचाकीने अज्ञात ट्रकला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात दोन सख्खे, तर एक चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर घडली आहे.बहिणीला भेटून परत येत असताना या भावांवर काळाने घाला घातला आहे.मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील कंडारकर […]
ताज्याघडामोडी
कर्मचाऱ्याने पार्सलमध्ये दिले शिळे अन्न, ग्राहकाची मालकाकडे तक्रार, पेटला वाद अन् घडला अनर्थ
मुकुंदवाडी बस स्थानकासमोरील आरजू हॉटेलमध्ये ग्राहकाने बिर्याणीची ऑर्डर दिली. मात्र बिर्याणी चांगली नसल्याचे लक्षात येताच ग्राहकाने नूडल्स ऑर्डर केली. यावेळी देखील शिळे नूडल्स मिक्स करत असल्यामुळे ग्राहकाने मालकाकडे तक्रार केली. मालकाने ग्राहकाची तक्रार ऐकून न घेता तुझं नेहमीच झाले, असे म्हणत लोखंडी कवचाने ग्राहकाचे डोके फोडले याप्रकरणी मालक आणि इतर कर्मचाऱ्यांवर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा […]
‘फॅबटेक’ फार्मसी विभागातील १० विद्यार्थ्यांची हेट्रोहेल्थकेअर व थ्री जेन कंपनी मध्ये निवड
सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची 3 GEN व Hetro HealthCare येथे Production आणि IT या पदांवर निवड झालेली आहे. यामध्ये महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी १० विद्यार्थ्याची निवड करण्यात आली ही निवड सक्षम मुलाखती द्वारे करण्यात आलेली आहे. या निवडीसाठी कंपनीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. हि मुलाखत १७ जुन २०२३ रोजी घेण्यात आली […]
पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची “सॅप पार्टस प्रा. लि.” कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी “सॅप पार्टस प्रा. लि.” कंपनीची २००९ साली स्थापन झाली आहे. हि बहुराष्ट्रीय नामांकित मेकॅनिकल कंपनी असुन या कंपनीचे पुणे येथे तीन कारखाने आहेत. याशिवाय नाॅर्थ अमेरिका, युरोप येथे शाखा असून हि कंपनी मेकॅनिकल सील, संरक्षण, बांधकाम, खाणकाम, शेतीविषयक अवजारे, ऑटोमोबाईल्स इत्यादी क्षेत्रात सेवा प्रदान करत आहे अशा या कंपनीत पंढरपुर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज […]
शाळेत पोरं भांडली, बाहेर पालक भिडले; मारामारीत एकाचा मृत्यू
शाळेत खेळत असताना दोन लहान मुलांमध्ये झालेला वाद हा पालकांपर्यंत पोहोचला. यावरुन पालकांमध्ये झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात घडला आहे. या प्रकरणी तिघा जणांवर शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तिघांनाही ताब्यात घेत अधिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे. सद्दाम सत्तार शेख (वय […]
बैलांना चारा टाकण्यासाठी गोठ्यावर गेले, समोरील दृश्य पाहून बापाने हंबरडा फोडला
झपाट्याने वाढत असलेली स्पर्धा धावपळीचे युग आणि स्वतःला सिद्ध करण्याकरिता युवा पिढीवर असलेला सततचा ताणतणाव या एक ना अनेक बाबी जेव्हा युवा वर्ग आपली जीवन यात्रा संपवतो तेव्हा समोर येतात. नेमकं का घडत आहे अशा घटना हे तपासणे गरजेचे आहे. बुलढाण्यातून पुन्हा एक अशीच घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु येथील […]
‘मला तू खूप आवडतेस, माझ्या…’ ३० वर्षीय महिला कंडक्टरचा विनयभंग, सहकाऱ्याला अटक
पुण्यात पीएमपीएमएल डेपोमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप आहे. महिलेच्या ओळखीतील सहकाऱ्याने पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारे हातवारे करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती […]
पंढरपूर,शेगाव दुमाला येथे अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई
अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने तालुक्यातील विविध ठिकाणी कारवाई करुन अवैध वाळू उपसा व वाहतूक करताना साडेसहा ब्रास वाळू तसेच टिपर, ट्रॅक्टर- ट्रॉली, पिकअप यावर कारवाई केली असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या […]
फॅबटेक फार्मसी कॉलेजच्या e – News Letter चे भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते प्रकाशन
सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालायामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रम, विविध कार्यक्रम तसेच नोकरी मेळावे, इत्यादि वेळोवेळी आयोजित केले जातात. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयामध्ये e-News Letter प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविला जातो. या e – News Letter च्या माध्यमातून प्रत्येक दोन महिन्यामध्ये होणारे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम व विविध विषयावरील आयोजित करण्यात आलेले परीसंवाद व कार्यशाळा तसेच औषधनिर्माणशास्त्र या क्षेत्रात होणार्या नवनवीन संशोधनाची माहिती प्रकाशित केली […]
पप्पा तुम्ही पोलिसात जाऊ नका, हे लोक मला मारुन टाकतील अन् मग गर्भवती लेकीसोबत भयंकर घडलं
एका गर्भवती महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्यांवर आहे. मृत विवाहितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत एसपींकडे तक्रार केली असून आरोपी सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या या प्रकरणाची दखल घेत एसपींनी स्टेशन प्रभारींना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ही घटना घडली आहे. हे प्रकरण नरैनी कोतवालीच्या मोतियारी गावातील आहे. […]