ताज्याघडामोडी

पंढरपूर,शेगाव दुमाला येथे अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई

अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने तालुक्यातील विविध ठिकाणी कारवाई  करुन  अवैध वाळू उपसा व  वाहतूक  करताना  साडेसहा ब्रास वाळू तसेच  टिपर,  ट्रॅक्टर- ट्रॉली, पिकअप यावर कारवाई केली असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध  वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी पथकाची  नेमणूक केली आहे.

पंढरपूर शहराजवळील कर्मयोगी शाळेजवळ टीपर पकडून  4 ब्रास वाळू जप्त केली. तसेच पंढरपूरातील  कुंभार गल्लीच्या सिमेंट रस्त्याला बिगर नंबरचा लेलँड पिकअप टेम्पो दीड ब्रास वाळूसह वाहतूक करत असताना पकडला त्याचबरोबर शेगाव दुमाला येथे एक ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर- ट्रॉली वर कारवाई करण्यात आली.   

सदर वाहनांवर तसेच संबधितांवर गौण खनिज अंतर्गत  कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार बेल्हेकर यांनी दिली. या पथकात नायब तहसलिदार पी.के. कोळी, वैभव बुचके, मंडलाधिकारी रिंगण चव्हाण, महसूल सहाय्यक राजू शिंदे, तलाठी समाधान शिंदे, दत्ता कोळेकर,राहुल गुटाळ,शिपाई भाऊ शिंदे, वाहन चालक रमेश जाधव सहभागी होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *