ताज्याघडामोडी

आमदार समाधान आवताडे यांनी टेंभुर्णी येथील ऑक्सिजन प्रकल्पास दिली भेट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यांचे गांभीर्य पाहता पंढरपूर – मंगळवेढा मधील डाॅक्टर यांनी ऑक्सिजन संदर्भात झालेल्या चर्चेनुसार विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी दि.04.05.2021 रोजी टेंभुर्णी येथील एस.एस. बॅग्स ऑण्ड फिलर्स प्रा.लि. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास तात्काळ प्रत्यक्ष भेट दिली. येथील ऑक्सिजन निर्मिती स्वरूप अनुषंगाने येणाऱ्या अडी – अडचणी आ. आवताडे यांनी जाणून घेतल्या […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकारनं बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द

नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करीत होता. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली होती. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. महाराष्ट्राने संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून विधीमंडळाच्या दोन्ही […]

ताज्याघडामोडी

पीएमओवर अवलंबून राहणे Useless, कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे सोपवा

कोरोना च्या दुसऱ्या लाटेने देशात मोठी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलंय की कोरोनाविरूद्धच्या लढाचे नेतृत्व नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात यावे. स्वामी यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटलंय की कोरोनाची तिसरी लाट येणार असून त्याचा धोका […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी व्यापाऱ्याला घातला गंडा!

नागपूर: आमच्या आईला करोना झाल्याचे सांगून दोन तरुणांनी नकली दागिने देऊन मिरची व्यापाऱ्याला साडे चार लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना नागपूर एमआयडीसीतील जयताळा भागात घडली. मिरची व्यापारी सुभाष नत्थुजी वाघमारे (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोन अनोळखी तरुणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे

ताज्याघडामोडी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ‘सर्वोच्च’ निकाल, राज्य सरकार प्रचंड आशावादी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. उद्या सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 मार्चला निकाल राखून ठेवला होता. मराठा आरक्षण वैध ठरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम निकाल येईल. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर […]

ताज्याघडामोडी

अडीच लाखाच्या बिलाची मागणी,मृतदेह ताब्यात देण्यास नकार

‘त्या’ हतबल कुटूंबाची व्यथा ऐकून तरी कोण घेणार ? राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरणाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडून पडली.अशातच पोटनिवडणुकीचा सोस पंढरपूर शहर तालुक्याला भलताच महागात पडला असून शहरात दरदिवशी वाढत जाणारे रुग्ण आणि या शहरातील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणारे बेड याचे प्रमाण अतिशय व्यस्त असून अशातच सोलापूर शहरात देखील ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने पंढरपूर  […]

ताज्याघडामोडी

“महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज पण मिळतात फक्त.”

मुंबई | देशासह राज्यात देखील ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात लसीकरण तर चालू केलं आहे पण अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काहींना पहिला डोस लवकर मिळत नाही तर काहींना दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागत आहे. यावर आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज आहे, पण फक्त 25 हजार […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाची दिल्लीतही दखल

नवी दिल्‍ली, 4 मे : देशभरात कोविड 19 च्या कहरामुळे परिस्थिती बिघडली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान अनेक राज्यांनी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एक महिना शिव भोजन थाळी मोफत देणार असल्याची […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरामध्ये कोरोनाची वाढती रुग्णांची संख्या विचारात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहण्यासाठी दररोज कोरोनाची १००० लस मिळावे

सध्या संपुर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोलापूर जिल्हयात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंढरपूर शहरातील नागरिकांची कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य सुविधा (कोविड केअर सेंटर हॉस्पिटल दवाखाने) अपुरी पडत आहे. त्याच्यावर ताण पडत आहे. पंढरपूर शहराची लोकसंख्या १ लाख असून शासनाकडून ७ दिवसातून फक्त २०० ते ३०० […]