

सध्या संपुर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोलापूर जिल्हयात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंढरपूर शहरातील नागरिकांची कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य सुविधा (कोविड केअर सेंटर हॉस्पिटल दवाखाने) अपुरी पडत आहे. त्याच्यावर ताण पडत आहे.
पंढरपूर शहराची लोकसंख्या १ लाख असून शासनाकडून ७ दिवसातून फक्त २०० ते ३०० कोविड १९ लसीचा पुरवठा सध्या होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने स्थापन केलेल्या लसीकरण केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी होऊन नागरिकांना लस न मिळाल्याने मोठया प्रमाणात असंतोष पसरला आहे व दररोज लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.तरी शहराची लोकसंख्या विचारात घेता दररोज १००० कोविडची लस नगरपरिषदेला मिळावी अशी विनंती नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी केली आहे.