गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रिचार्ज आले नाही म्हणून कस्टमर केअरला लावला फोन आणि खात्यावरील १ लाख गायब

मोबाईलवर ऑनलाइन रिचार्ज मारलेल्या निलेश रामभाऊ वेरुळकर (वय ३०, सध्या रा. कुडाळ नाबरवाडी, मूळ रा. बुलढाणा) यांना मोबाईलवर रिचार्ज आले नाही मात्र त्यांच्या खात्यावरील १ लाख ५ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली याबाबत निलेश वेरुळकर यांनी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दिली असून कुडाळ पोलिसांनी त्या आज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून धुवाँधार पाऊस बरसत आहे. ढगाळ वातावरण आणि बरसणाऱ्या पावसाने परिसरात काळोख दाटला आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आता तो जोर पकडणार असल्याचं चिन्हं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 11 आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘संघटनेचा हिसका दाखवू का’ म्हणत पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की, 2 महिलांसह तिघांना अटक

कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत मोटारीतून विनामास्क ७ जणांनी प्रवास केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईला विरोध करून पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास धायरीतील उंबऱ्या गणपती चौकात घडली. रितेश माणिक जगधने (वय 28, रा. वडगाव शेरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे […]

ताज्याघडामोडी

लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना औषधांची गरज नाही! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा नागरिकांना मोलाचा सल्ला

कोरोनाचे संकट काहीसे कमी होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिंदुस्थानातील नागरिकांना एक दिलासादायक सल्ला दिला आहे. कोरोना आजाराची लक्षणे नसलेल्या नागरिकांनी सकारात्मक विचार करावेत आणि सकस आहार घेऊन आपली रोगप्रतिकारकशक्ती (इम्युनिटी) वाढवावी. त्यांना कोरोनावरील कोणत्याही औषधांची गरज नाही, असे सांगत वैद्यकीयतज्ञांनी कोरोनाचा धसका घेतलेल्या नागरिकांना मोठा धीर दिला आहे. लक्षणे नसतील तर उत्तम आहार घ्या, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाचलुचपतची कारवाई : ग्रामसेवकास 6 हजार 500 रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांस रस्त्यांच्या केलेल्या कामाचे बिलाचा चेक दिल्यानंतर त्याबदल्यात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ज्ञानेश्वर दगडू गायकवाड (वय-48) असे लाच घेणाऱ्या ग्रामसेवकांचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहीती सातारा लाप्रवि पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली आहे. मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हा पोट ठेकेदार असून त्यांना रस्त्याचे […]

ताज्याघडामोडी

पूर रेषेतील गावांनी दक्षता बाळगावी          तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या सूचना

पूर रेषेतील गावांनी दक्षता बाळगावी तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या सूचना      पंढरपूर, दि. 08:-  गेल्या वर्षी  अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे  तालुक्यातील नदी काठच्या गावांसह शेती पिकांचे  तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तसेच जिवित व पशुहानी टाळण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन  यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच भीमा नदी काठच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हळंदे टोळीविरूद्ध मोक्का, पोलीस आयुक्तांकडून 27वी कारवाई

पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत दर्शन युवराज हळंदे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार मोक्कानुसार करण्यात आलेली ही 27वी कारवाई आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दर्शन युवराज हळंदे (वय 21, रा. अपर बिबवेवाडी ) आणि रोहन उर्फ मोन्या बाळू सातपुते (वय 18, रा. कात्रज -कोढवा रस्ता) […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जमावाच्या मारहाणीत वायरमनचा मृत्यू

भडगाव येथील महावितरणाच्या अभियंत्याला मारहाण करणार्‍यांना थांबवण्यासाठी गेलेल्या वायरमन गजानन राणे यांचा मृत्‍यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव येथे काल (सोमवार) शिवसेनेच्या वतीने शेतकर्‍यांचे कृषीपंप वीज तोडणी, कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी भडगाव उपविभागातील शहर, […]

ताज्याघडामोडी

जैन समाजाची एकता ही काळाची गरज

सकल जैन समाज,नगर रोड वडगाव शेरी, पुणे येथे जैन समाजातील युवकांच्यावतीने आयोजित निषेध सभेमध्ये बोलताना फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अनुप शहा म्हणाले की, जैन समाजाला एकीची अत्यंत गरज असून भविष्यामध्ये जर समाजामध्ये एकी राहिली नाही तर समाजाचे मोठे नुकसान होणार आहे . बराच काळापासून अनूप मंडलकडून दिशाभूल करणार्‍या पोस्टद्वारे जैन समाजाविरूद्ध चुकीची माहिती पसरवली जात आहे. […]

ताज्याघडामोडी

सावधान! केंद्राकडून हेल्मेटबाबत नवे नियम लागू; 5 लाखांचा दंड, 1 वर्षाची कैद…जाणून घ्या…

देशभरात करोडो हेल्मेट ही दुय्यम दर्जाची किंवा बनावट आहेत. या बनावट हेल्मेटच्या वापरावर 1 जून 2021 पासून बंदी घालण्यात आली आहे. जर हे बेकायदेशीर म्हणजेच ISI (आयएसआय) मार्क असलेले हेम्लेट विकत असेल किंवा घेत असेल तर त्या दोघांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे तुम्ही जेथून हेल्मेट खरेदी करणार असाल तिथे नीट पाहणी आणि […]