गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाचलुचपतची कारवाई : ग्रामसेवकास 6 हजार 500 रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांस रस्त्यांच्या केलेल्या कामाचे बिलाचा चेक दिल्यानंतर त्याबदल्यात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ज्ञानेश्वर दगडू गायकवाड (वय-48) असे लाच घेणाऱ्या ग्रामसेवकांचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहीती सातारा लाप्रवि पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिली आहे.

मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हा पोट ठेकेदार असून त्यांना रस्त्याचे काम मिळाले होते.

त्या केलेल्या कामाचे 3 लाख 50 हजार रुपयांचे बिल झाले होते. बिल मंजूर करून चेक दिले होते. त्या मोबदल्यात 3% दराने पैशाची मागणी केली होती. पडताळणी मध्ये 7 हजार 500 रूपये (3% प्रमाणे)ची लाचमागणी करून तडजोडीअंती 6 हजार 500 रुपये घेतांना रंगेहाथ पकडले आहे.

आज मंगळवार 8 जून रोजी सापळा लावण्यात आला होता. पुणे लाप्रवि पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, पुणे लाप्रवि अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आनंदराव सपकाळ,काटवटे, पो. हवा. भरत शिंदे, पो.ना.विनोद राजे, प्रशांत ताटे, विशाल खरात, श्रध्दा माने, पो.काॅ. संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले, निलेश वायदंडे, शितल सपकाळ यांनी कारवाई केली. तपास पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला यांच्याकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *