गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रिचार्ज आले नाही म्हणून कस्टमर केअरला लावला फोन आणि खात्यावरील १ लाख गायब

मोबाईलवर ऑनलाइन रिचार्ज मारलेल्या निलेश रामभाऊ वेरुळकर (वय ३०, सध्या रा. कुडाळ नाबरवाडी, मूळ रा. बुलढाणा) यांना मोबाईलवर रिचार्ज आले नाही मात्र त्यांच्या खात्यावरील १ लाख ५ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली याबाबत निलेश वेरुळकर यांनी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दिली असून कुडाळ पोलिसांनी त्या आज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात निलेश वेरुळकर यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की ३१ मे रोजी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास त्यांनी मोबाईलवर ऑनलाईन रिचार्ज केले हे रिचार्ज झाले नाही म्हणून त्यांनी केलेल्या रिचार्जची रक्कम परत मिळावी म्हणून गुगलवर सर्च करून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअर वरील संपर्क नंबरवर फोन करून याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांना अज्ञात इसमाने आपण एसबीआय केअर सेंटर मधून अधिकारी बोलत असल्याचे सांगून त्यांना एनीडेस्क ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले त्यानुसार निलेश वेरुळकर यांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेतले डाऊनलोड झाल्यावर या ॲप्लिकेशनचा युजर आयडी व मोबाईल नंबर त्या अधिकाऱ्याने मागितला त्यानुसार निलेश वेरुळकर यांनी युजर आयडी व मोबाईल नंबर दिला काही वेळातच एसबीआयच्या निलेश वेरुळकर यांच्या खात्यावरील १ लाख ५ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आले याबाबत त्यांना एसबीआयकडून मेसेज आला दरम्यान निलेश वेरूळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे या त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात विरुद्ध भादवि कलम ४१७, ४१९, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डी. डी. माने करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *