महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केलीय. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. “स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली.,” अधिका-याने सांगितले की, गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. आयात केलेल्या […]
ताज्याघडामोडी
पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, धारदार चाकूने 30 वेळा वार करुन हत्या
हरियाणातील सोनीपत शहरात पती-पत्नीच्या नात्याच्या ठिकऱ्या उडाल्याची घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्या अंगावर धारदार शस्त्राने 30 हून अधिक वेळा वार केले, यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. हरियाणातील सोनीपत शहरात तारानगर येथे राहणाऱ्या शत्रुघ्न नावाच्या व्यक्तीला पत्नी पूनमच्या चारित्र्यावर संशय होता. हत्येच्या घटनेची माहिती मिळताच सोनीपत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल […]
एसटीच्या 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त, महामंडळाची कठोर कारवाई
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे नाव घेत नसून आज महामंडळाने अखेर 238 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शुक्रवारी महामंडळाने संपात सहभागी 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 2776 इतकी झाली आहे. 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून संप मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने महामंडळाने संप मोडायच्या हालचाली चालू […]
तुपकरांची प्रकृती खालावल्याने समर्थकांचा उद्रेक, पोलिसांच्या वाहनाची तोडफोड
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. नागपूरमध्ये पोलिसांनी आंदोलन चिरडल्यानंतर तुपकरांनी आपल्या निवासस्थानासमोर सत्याग्रह सुरू केला असून, त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनस्थळी शेख रफिक या कार्यकर्त्याने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. त्याचवेळी चिखली मार्गावर कार्यकर्त्यांनी […]
विजेचा शॉक बसून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, धक्कादायक घटना
एका शेतकऱ्याने हरणाच्या व रानडुकराच्या त्रासापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतात लावलेल्या विद्यूत तारेच्या करंटला चिटकून दोन सख्खे भावांचा मृत्यू झाला.हुसेन फकिरा शेख (50) व जाफर फकिरा शेख (55) अशी मृतांची नावे आहेत. हुसेन आणि जाफर हे रात्रीच्या अंधारात शेतातील घराकडे जात असताना दोघेही हरण व डुकरापासून शेताचे संरक्षण व्हावे म्हणून लावलेल्या विद्युत तारेला चिकटले. आरडाओरडा […]
मंदिरात दुहेरी हत्याकांड; पुजारी आणि साध्वीचे मृतदेह आढळल्याने खळबळ
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका मंदिरामध्ये पुजारी आणि साध्वीची हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार करून त्यांची हत्या करण्यात आली. दोघांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी मंदिरात आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन ते विच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली जात आहे. फॉरेन्सिक […]
कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुदैर्वी
केंद्र सरकार काही शेतकऱ्यांच्या दबावाला बळी पडले आहे. सरकारने त्यांच्यासमोर सरकारने गुढघे टेकवल्याचे दिसून येते. मात्र कायदे मागे घेणे हा यावरील मार्ग नव्हता. त्यात काही सुधारणा आवश्यक होत्या. त्या करून कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे होते,आता पुढील पन्नास वर्षे कोणतेही सरकार कृषी कायद्यात सुधारणा करण्यास धजावणार नाही, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. या कायद्यांचा आढावा […]
मतदारांना खुश करण्यासाठी पुढाऱ्याने जेवणावळीच्या पंगती उठवल्या
भारतीय लोकशाहीने या देशातील जनतेला दिलेले सर्वात मोठे शस्त्र म्हणजे मतदानाचा अधिकार.मात्र मतदानापूर्वीच्या काही दिवस आधी मतदारांना खुश करण्यासाठी पैसे वाटणे,सामिष जेवणावळी उठवणे असे फंडे वापरले जात असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून उघड गुपित जगजाहीर आहे.निवडणुकीच्या काळात किंवा निवडणूक जवळ आली कि मतदारांना खुश करण्यासाठी अनेक नेते मंडळी उदार होतात. मात्र त्या पाठीमागेही काळी बाजू […]
‘त्या’ वादग्रस्त अधिकाऱ्याच्या नावे परमिटरूम बार चा परवाना असल्याचे उघड
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केलाय. ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधलाय.“समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत […]
मोदी सरकार झुकलं, तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी […]











