ताज्याघडामोडी

विजेचा शॉक बसून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, धक्कादायक घटना

एका शेतकऱ्याने हरणाच्या व रानडुकराच्या त्रासापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतात लावलेल्या विद्यूत तारेच्या करंटला चिटकून दोन सख्खे भावांचा मृत्यू झाला.हुसेन फकिरा शेख (50) व जाफर फकिरा शेख (55) अशी मृतांची नावे आहेत.

हुसेन आणि जाफर हे रात्रीच्या अंधारात शेतातील घराकडे जात असताना दोघेही हरण व डुकरापासून शेताचे संरक्षण व्हावे म्हणून लावलेल्या विद्युत तारेला चिकटले. आरडाओरडा ऐकू आल्यानंतर त्यांचा पुतण्या अरबाज याने घटनास्थळी धाव घेतली. दोघा जखमींना बीड येथील दवाखान्यात घेऊन जाताना त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *