ताज्याघडामोडी

एसटीच्या 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त, महामंडळाची कठोर कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे नाव घेत नसून आज महामंडळाने अखेर 238 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शुक्रवारी महामंडळाने संपात सहभागी 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 2776 इतकी झाली आहे.

27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून संप मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने महामंडळाने संप मोडायच्या हालचाली चालू केल्या आहेत. एसटी महामंडळाने संपात सहभागी रोजंदारी कामगारांना 24 तासांत कामावर हजर व्हा अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल, अशा कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या.

महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कर्मचाऱ्यांना 24 तासांत कामावर येण्याची नोटीस बजावली होती. त्यापैकी 238 रोजंदारी कामगारांना आज अखेर त्यांची सेवा समाप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर आज 297 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबित झालेल्या कामगारांची एकूण संख्या आता 2776 इतकी झाली आहे.

दरम्यान, सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार महामंडळाने विविध मार्गांवर 131 बसेसद्वारे 3,517 प्रवाशांची वाहतूक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *