जालना: जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावात काल धक्कादायक घटना घडली. हसत्या खेळत्या पालोदे कुटुंबासह गोकुळ गावावर शोककळा पसरली.पुतण्याला पाहण्यासाठी आलेल्या मुलीकडाच्या पाहुण्यांसमोरच मुलाच्या काकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटकयाने निधन झाले.शेणफड पालोदे (वय ६२) असे त्यांचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ येथे घडली. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील गोकुळ येथील उत्तम पालोदे […]
ताज्याघडामोडी
जिममध्ये घाम गाळून बॉडी बनवली, पण ‘त्या’ एका कारणाने स्वत:ला पेटवून घेतलं, तरुणाच्या आत्महत्यने खळबळ
एका बॉडिबिल्डरच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. तरुण वयात मुलगा गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार एका लोन प्रकरणात बँक आणि पोलिसांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. दिल्लीतल्या गोकुलपूरी परिसरातील ही घटना आहे. इथं राहणाऱ्या 34 वर्षांच्या कपिल राज या तरुणाने 2019 मध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेतून 18 लाख 50 हजार रुपयांचं […]
रविंद्र धंगेकरांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मोठा आरोप
कसबा पोटनिवडणुकीतील राजकीय वातावरण अद्यापही तापलेले आहे.भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. यावरुन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी रविंद्र धंगेकरांवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात पैसे वाटले […]
आईशी भांडण, रागा रागात अल्पवयीन मुलीनं घर सोडलं अन् पुढे तिच्यासोबत घडत गेलं ते भयंकरच
रागा रागात घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर महिनाभरात वेळोवळी एकापेक्षा जास्त जणांनी अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शहरातील एका भागात ही १६ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह रहाते. ७ जानेवारीला अल्पवयीन […]
शाळेत नुकतंच ॲडमिशन घेतलं, मास्तरच जीवावर उठला; पुण्यात दिव्यांग मुलाला पाईपने मारहाण
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील धामणखेल या गावात एका दिव्यांग आणि गतिमंद असलेल्या मुलाला शाळेतील शिक्षकाने आणि कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा […]
गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ व्हायरल, रुपाली चाकणकर सरसावल्या, पोलिसांना रोखठोक आदेश
आपल्या अदाकारीने आणि नृत्याने तरुणाईला भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा आक्षेपार्ह व्हिडिओ काही विकृतांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. पुण्यातील एका शोदरम्यान गौतमी कपडे बदलत असताना तिचा व्हिडीओ शूट करुन विकृतांनी तो व्हिडीओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर गौतमीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्याची दखल राज्य महिला आयोगाने देखील घेतली आहे. राज्य महिला […]
ट्युशनसाठी म्हणून घरातून बाहेर पडली, दोघांनी पाठलाग केला, अन्…
ट्युशनसाठी निघालेल्या मुलीला रस्त्यात अडवून सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांना अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. जनेंद्र नगरसिंगराव कोया आणि ऋषिकेश दळवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघंही सराईत गुन्हेगार आहेत. २२ फेब्रुवारीरोजी तरुणी ट्युशनसाठी जात असताना तिच्यामागून दोन तरुण चालत होते. त्याचवेळी त्यांनी तिचं ल७ नसल्याचे पाहून गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची चेन खेचली,. भांबावलेल्या […]
पती-पत्नीने घरामध्ये साठवला कोट्यवधींचा अवैध पदार्थ, पोलिस पथकाचेही विस्फारले डोळे
एएनटीएफ टीम आणि राया पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत उत्तर प्रदेशातील मथुरा येथील राया पोलीस स्टेशन हद्दीतील पडारी गावात ड्रग माफियांच्या घराच्या तळघरातून ३५० किलो गांजाची खेप जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज माफिया आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. जप्त केलेल्या भांगाची किंमत १ कोटी ७५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबत […]
वर्षा बंगल्याचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख, चहात सोन्याचं पाणी घातलं होतं काय?, अजितदादा भडकले
मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचं ४ महिन्यांचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख रुपये आलेलं आहे. प्रसारमाध्यमांनी तशा बातम्या दिलेल्या आहेत. वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जायचं काय? असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला. आम्हीही उपमुख्यमंत्री म्हणून काम केलंय. माझे अनेक जवळचे सहकारी मुख्यमंत्री होते, पण त्यांच्या […]
चिक्कू का तोडला? महिलेने हटकलं, तरुणाला खटकलं; घरात शिरून महिलेवर…
शहरातील सिडको परिसरात असलेल्या हनुमान चौक शॉपिंग सेंटर येथील एका घराच्या अंगणाबाहेरील चिकूच्या झाडावरील चिकू तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडास महिलेने हटकल्याने त्याने थेट घराचा सुरक्षा दरवाजा ओलांडून घरात शिरून महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. सिडको परिसरात गावगुंडांचा हैदोस वाढल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले […]











