ताज्याघडामोडी

गौतमी पाटीलचा तो व्हिडीओ व्हायरल, रुपाली चाकणकर सरसावल्या, पोलिसांना रोखठोक आदेश

आपल्या अदाकारीने आणि नृत्याने तरुणाईला भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा आक्षेपार्ह व्हिडिओ काही विकृतांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. पुण्यातील एका शोदरम्यान गौतमी कपडे बदलत असताना तिचा व्हिडीओ शूट करुन विकृतांनी तो व्हिडीओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर गौतमीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्याची दखल राज्य महिला आयोगाने देखील घेतली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गौतमीच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत सायबर पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिलेत. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा, अशी महत्त्वाची सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्याने चाकणकर यांनी सायबर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांना केली आहे.

प्रसिद्ध नृत्यांगणा, कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील.

पुण्यातील एका स्टेज शो दरम्यान कपडे बदलताना गौतमी पाटील हिचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय. गौतमी पाटीलची लोकप्रियता वाढता असताना तिला बदनाम करण्यासाठी हा घृणास्पद प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकारावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतायेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *