गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आईशी भांडण, रागा रागात अल्पवयीन मुलीनं घर सोडलं अन् पुढे तिच्यासोबत घडत गेलं ते भयंकरच

रागा रागात घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर महिनाभरात वेळोवळी एकापेक्षा जास्त जणांनी अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

शहरातील एका भागात ही १६ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह रहाते. ७ जानेवारीला अल्पवयीन मुलीचे तिच्याआईसोबत भांडण झाले. या रागातून आईला काही एक न सांगता अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली. यादरम्यान तिला शहरात नितू उर्फ जोया राजू बागडे या नावाची महिला भेटली. जोया हिने ओळख करत अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेले. त्याठिकाणी अल्पवयीन मुलगी पाच ते सहा दिवस राहिली. त्यानंतर काही दिवसांनी बाबाच्या दर्ग्यावर दर्शनासाठी जाण्याचा बहाणा जोयाने केला. जोया ही अल्पवयीन मुलीला स्पेशल रिक्षाने चाळीसगावात घेवून गेली.

याठिकाणी जोया हिने अल्पवयीन मुलीला ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार दोघे (रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांच्याकडे ठेवले. काही दिवस तिच्याकडून काम करून घ्या. तुमच्या घरी राहू द्या, असे जोया हिने ज्योती आणि चंद्रकांत या दाम्पत्याला सांगितले. याठिकाणी अल्पवयीन मुलीने मी काही चुकीचे काम करणार नाही. मला घरी जायचे आहे, असे सांगितले. पण जोया आणि ज्योती या दोघींनी मुलीला नकार दिला. तुला रोज रात्री गिऱ्हाईकांडून भरपूर पैसे मिळतील. फक्त दोन तीन गिऱ्हाईक काढ, अशी दमदाटी केली आणि याठिकाणाहून जोया निघून गेली.

यादरम्यानच्या काळात ज्योती व तिचा पती चंद्रकांत या दोघांनी अल्पवयीन मुलीला सोडा पाजला. मुलीला चक्कर आली. यादरम्यान अज्ञात कुणीतरी इसम आला आणि त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. पोट दुखत असल्याचे पीडित मुलीने ज्योती हिला सांगितले. सोडा पिल्यामुळे पोट दुखत असेल, असे ज्योतीने मुलीला सांगितले. यादरम्यान वेळावेळी पीडित मुलीने जळगावला जायचे, असे सांगितले. मात्र ज्योती आणि चंद्रकांत या दोघांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तुला मारून टाकू, जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच या धमकीतून मुलीला त्यांचे घरी तसेच इतर हॉटेलवर घेवून जात तिला अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. यापोटी ज्योती व चंद्रकांत यांनी गिऱ्हाईकांकडून प्रत्येकी ३ ते चार हजार रुपये घेतले. अशा प्रकारे ज्योती व चंद्रकांत यांनी महिनाभर मुलीला धमकी देत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले.

जळगावला जायचे सांगत, दाम्पत्याने सोडा पाजून तिला रेल्वेत बसून दिले. सोडा प्यायल्यावर मुलीला उमजले नाही. जेव्हा ती उठली तेव्हा ती ठाण्यात पोहचली होती. याठिकाणी तिला पोलिसांनी कल्याण येथील महिला व बाल कल्याण मंडळ येथे दाखल केले. मात्र याठिकाणी मुलीने भितीने तिच्यासोबत घडलेला प्रकार न सांगता आईसोबत भांडण झाल्याचे सांगीतले. त्यावेळी पोलिसांनी मुलीच्या आईला संपर्क साधत मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *