आमदार मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खुद्द देवेंद्र फडणवीस यांना सुनावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे पोलिसांसमोरच एका युवकाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. माझी सीबीआय चौकशी लागावी, म्हणून सुप्रीम कोर्टात वकीलांची फौज उभी केली. माझ्यावर आरोप करणाऱ्या […]
ताज्याघडामोडी
पप्पा-मम्मी मला माफ करा, काँग्रेस आमदाराच्या बंगल्यावर विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं; कारण…
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील काँग्रेस आमदार ओंकार मरकाम यांच्या बंगल्यावर एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा विद्यार्थी कॅन्सरने त्रस्त असून त्याच्यावर अभ्यासासोबतच आमदार निवासात उपचार सुरू होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृतदेहाजवळून पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये वडिलांना उद्देशून विद्यार्थ्याने लिहिले आहे […]
लेकीचं लग्न पाहायचंय, आयसीयूत झालं शुभमंगल सावधान, अन् काहीच तासात…
बिहारच्या गयामध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेने आयसीयुतच आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. दुर्दैव म्हणजे या लग्नाच्या काही तासांनंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीय, नातेवाईक तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले. नेमकं प्रकरण काय? गया जिल्ह्यातील गुरुरु ब्लॉकमधील बाली गावातील रहिवासी लालन कुमार यांची पत्नी पूनम कुमारी वर्मा यांना हृदयविकाराचा त्रास होता. आशा […]
डबा खात असताना बिबट्याची झडप, फरफटत नेले; आई-बापाच्या डोळ्यांसमोर चिमुकल्याचा अंत
वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढला आहे. नाशिकमध्ये सहा वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना ताजी असतानाच आता चंद्रपूर जिल्ह्यात एका नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे. या मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आई-वडिलांसोबत शेतात गेलेल्या नऊ वर्षीय मुलगा जेवणाचा डब्बा खाण्याकरीता शेतातीलच एका धुऱ्यावर गेला. त्याचवेळी बिबट्या त्यांच्यावर हल्ला केला. […]
गर्भवती महिलेची विहिरीत उडी, पाण्यात पडताच दिला बाळाला जन्म
चंद्रपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सुमठाना गावात एका 9 महिन्याच्या गर्भवती महिलेनं विहिरीत उडी घेतली. हैराण करणारी बाब म्हणजे पाण्यात उडी घेताच तिने बाळाला जन्म दिला. यात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. 27 वर्षीय निकिता […]
गणपतीपुळ्याला जात असताना घडला अपघात, बाप-लेकाचा जागेवरच मृत्यू
ख्रिसमस आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे सुट्टीवर तसंच देवदर्शनाला राज्यातले नागरिक मोठ्याप्रमाणावर जात आहेत. इंदापूरचे महेंद्र घोगरे हेदेखील त्यांच्या 4 वर्षांच्या मुलासोबत गणपतीपुळ्याला देवदर्शनाला जात होते, पण एका चुकीमुळे या बाप-लेकांना जीव गमवावा लागला आहे. इंदापूर तालुक्यातील भाविक सुट्टीमुळे गणपतीपुळ्याला देवदर्शनासाठी निघाले होते, पण त्यांच्या गाडीला सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे अपघात झाला आहे. हा अपघात कराड-रत्नागिरी राज्य […]
मोलकरणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला अटक
अण्णा नगर येथील रॉक्स गॅब्रिएल फ्रँकटन (३६) हे गेल्या १२ वर्षांपासून आयकर कार्यालय नुंगंबक्कम येथे वरिष्ठ कर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याच कार्यालयात एक विधवा महिलाही गेल्या ५ वर्षांपासून ऑफिस मेड म्हणून काम करत आहे. महिलेने नुंगमबक्कम पोलिस स्टेशनमध्ये रॉक्सने आपला लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीत, 14 तारखेला रॉक्सने तिला आपली खोली […]
फुकट अंडा राईस दिला नाही म्हणून पठ्ठ्याने काढले पिस्तूल!
फुकट अंडा राईस देण्यास नकार दिलेल्या हात गाडी चालकाला पिस्तुलाच्या धाकाने जिवे मारण्याची धमकी देऊन गल्ल्यातील पैसे घेऊन फरार झालेल्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे असे जप्त करण्यात आले आहे. बंड्या उर्फ काळुराम प्रशांत थोरवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात ही घटना घडली आहे. […]
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर देखील हल्ला अकोला शहरातील हरिहर पेठ भागात आज रविवारी सकाळी ११ वाजता दोन गटात हाणामारी सुरू आहे, अशी माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली. पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा आणि प्रवीण अहीर गटात किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाली. या हाणामारी दरम्यान अनेकांच्या हातात लाठ्या काठ्या, […]
स्टेट बँकेच्या मॅनेजरची सायबर भामट्याकडून फसवणूक ; लावला 19 लाखाचा चुना
पुण्यातील स्टेट बँकेच्या मुख्य ट्रेझरी शाखेच्या मॅनेजरची 19 लाखाची फसवणूक सायबर भामट्याकडून करण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ या ज्वेलर्सचे डायरेक्टर किशोर कुमार शहा बोलत आहे. असे सांगून बँकेला बनावट ई-मेल पाठवत 19 लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करायला सांगून मॅनेजरची फसवणूक केली आहे. पुण्यातील ट्रेझरी शाखेतील मॅनेजरलाच प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ […]











