ताज्याघडामोडी

डबा खात असताना बिबट्याची झडप, फरफटत नेले; आई-बापाच्या डोळ्यांसमोर चिमुकल्याचा अंत

वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढला आहे. नाशिकमध्ये सहा वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना ताजी असतानाच आता चंद्रपूर जिल्ह्यात एका नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला आहे. या मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

आई-वडिलांसोबत शेतात गेलेल्या नऊ वर्षीय मुलगा जेवणाचा डब्बा खाण्याकरीता शेतातीलच एका धुऱ्यावर गेला. त्याचवेळी बिबट्या त्यांच्यावर हल्ला केला. मुलाला अर्धा किलोमीटर बिबट्याने फरफटत नेले. त्याला वाचवण्यासाठी आई-वडील धावून गेलेत. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.डोळ्यांदेखत आपल्या पोटच्या मुलाचा जीव जाताना बघण्याची दुर्दैवी वेळ आई-वडिलावर ओढावली. ही घटना कोरपणा तालुक्यात येणाऱ्या जांभोळा शेतशिवारात घडली आहे. नितीन आत्राम असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

जांभोळा गावातील नितीन आत्राम हा नऊ वर्षाचा मुलगा आई-वडिलांसोबत रविवारी शेतात गेला होता. सायंकाळपर्यंत आई-वडील शेतात काम करीत होते. या दरम्यान मुलाला भूक लागल्याने तो आईवडिलांनी त्याच्यासाठी आणलेला डब्बा खाण्याकरीता शेतातीलच एका धुऱ्यावर गेला होता. आई-वडिल एकीकडे काम करीत होते. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास शेतशिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने डब्बा खात असलेल्या त्याच्यावर हल्ला चढवला.

घटनास्थळापासून त्या चिमुकल्याला बिबट्याने अर्धा किलोमीटर फरफटत नेले. लगतच जनावरे चारत असलेल्या देवराव धुर्वे याला सदर घटना लक्षात आली. त्यांनी मुलाला वाचविण्याकरीता प्रचंड आरडाओरड केली. आई – वडिलांनी मुलाला वाचविण्याकरीता घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. गावकरीही भीतीच्या छायेत वावरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *