ताज्याघडामोडी

मंत्री दादा भुसेंनी पोलिसांसमोर युवकाला फटकावलं’, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून VIDEO ट्विट

आमदार मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खुद्द देवेंद्र फडणवीस यांना सुनावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे पोलिसांसमोरच एका युवकाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. माझी सीबीआय चौकशी लागावी, म्हणून सुप्रीम कोर्टात वकीलांची फौज उभी केली. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेची आपण घेट घेतली. मुख्यमंत्रीसाहेब आपण दोघे मित्र आहोत, हे ही तुम्ही विसरलात… आता पोलिसांसमोर युवकाला फटकावणाऱ्या मंत्री भुसेंवर आपण कोणती कारवाई करणार? त्यांच्यावर कोणता गुन्हा लावणार? असे सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारले आहेत.

अनंत करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. अगदी न्यायालयात देखील वकीलांची फौज उभी करुन मला अडकविण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली, असा आरोप करत आता सत्ताधारी पक्षाच्या आमदार-मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय कारवाई करणार? असा प्रश्न आव्हाडांनी विचारला आहे.

मंत्री दादा भुसे एका युवकाला पोलिसांसमोर फटकावतात. शिव्या देतात.. मुख्यमंत्री साहेब कुठला गुन्हा पोलिस दाखल करणार? माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलंत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक झाली.

पोलिसांची खोटी प्रतिज्ञा पत्र सुप्रीम कोर्टात द्यायला लावलीत. मी सराईत गुन्हेगार आहे असे प्रतिज्ञा पत्र पोलीस पोलीस सर्वोच्च न्यायालयात देतात… वाह साहेब… आपण मला फाशी देऊ शकत नाही किंवा मुडदाही पाडू शकत नाही. माझ्या विरुद्ध जिने ३५४ दाखल केला, जिने रात्री आपली भेट घेतली, तिच्या विरोधात जबरदस्ती करुन छोट्या पोरींना शरीर विक्री करण्याचा गुन्हा नोंद झाला आहे. आपण माझे आयुष्य उद्धवस्त करण्यासाठी कारस्थान रचलंत. आपण मित्र होतो… विसरलात, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *