नगर पालिका क्षेत्रातील विकास कामे,बांधकाम परवाने,आणि विकसन व अतिक्रमण या बाबत सुनियोजीत आणि राज्य शासनायाची ने निर्धारित केलेल्या नियमावली व निकषानुसार कार्यवाही करण्यात नगर पालिकेतील राजकीय सत्ता आणि दबाव यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेत हि जबाबदारी नगर रचनाच्या सहा. नगररचनाकार यांच्यावर टाकण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला.यासाठी शासनाच्या नगर रचना विभागातील अभियंते,नगररचनाकार,साह्याय्यक नगर रचनाकार आदींची नगर पालिकांमध्ये प्रतिनियुक्ती […]
ताज्याघडामोडी
24 तासांत कामावर हजर व्हा; अन्यथा सेवा समाप्त, एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटीस
एसटी कर्मचाऱयांचा संप मोडून काढण्यासाठी आता एसटी महामंडळ सरसावले आहे. एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कामगारांनी 24 तासांच्या आत नोकरीवर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आपली तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक रद्द करण्यात येईल असे या नोटिसीत म्हटले आहे. मंगळवारी एसटी महामंडळाचे […]
पुढचे तीन दिवस राज्यावर पावसाचं संकट, ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
राज्यावर पुन्हा एकदा पावसाचं संकट आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाचा अंदाज आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि […]
सट्टेबाजीचे 4 लाख वसूल करण्यासाठी तरुणाचं अपहरण; बेदम मारहाण करत 1 लाख लुटले
मोबाइलवर खेळलेल्या सट्टेबाजीचे चार लाख रुपये वसूल करण्यासाठी 5 जणांनी एका तरुणाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाचं अपहरण करून त्याला लाथाबुक्क्यांनी, पाइप आणि कंबरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तरुणाच्या खिशात ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या आणि गुगल पे वरून 15 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले […]
“काय होतास तू? काय झालास तू?”; देवेंद्र फडणवीसांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आजची बैठक चर्चेचा विषय ठरली ते देवेंद्र फडणवीसांमुळे. त्यांनी आजच्या बैठकीत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, अमरावती हिंसाचार अशा अनेक मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. याबरोबरच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावत खोचक टीका केली आहे. काय होतास तू काय झालास तू […]
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पदाधिकारीच निघाली दुचाकी चोरीतील आरोपी
वाहनचोरांमुळे त्रस्त असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने वाहनचोरांच्या एका टोळीला अटक केली आहे.या टोळींमध्ये तरुणांबरोबर एका तरुणीचाही समावेश आहे. ही तरुणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती यामध्ये स्पष्ट झाली आहे. अटक झालेल्या या युवतीचे नाव वैष्णवी देवतळे असे आहे. ती आपल्या दोन साथीदारांसह वाहनांची चोरी करायची असं पोलिसांनी […]
आधी पैसे भरा, मग वीज वापरा, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
राज्य सरकारने शेतकऱ्यांचं थकीत वीज बील माफ करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी बोलताना वीज बील माफ करण्याची मागणी अजित पवारांकडे केली. यावेळी ठाकरे सरकार नवीन सिस्टीम आणण्याच्या विचारात असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. थकीत वीज बील माफ करण्याच्या […]
एसटी संपाचा तिढा कायम; हायकोर्टानं दिला ‘हा’ अंतरिम आदेश
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला एसटी संप मिटण्याची शक्यताधुसर झाली आहे. हा संप सुरूच ठेवणार असल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आलं. एसटीच्या संपावर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. राज्य सरकार न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करत आहे. त्यानुसार विलिनीकरणाच्या […]
५ दिवसांवर आलं होतं लग्न; मुलगी घर सोडून पळून गेली, वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्न पाच दिवसांवर आले असताना, नवरी मुलगी घरातून पळून गेली. समाजात बदनामी होईल या भीतीनं मुलीच्या वडिलांनी शनिवारी रात्री आत्महत्या केली. औरंगाबाद शहरातील संग्राम नगरजवळ ही घटना घडली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या ४८ वर्षीय वडिलांनी घराजवळच आत्महत्या केली. कुटुंबीयांची बदनामी होईल या भीतीने […]
लस घ्या अन्यथा शासकीय लाभावर निर्बंध – जि.प.सिईओ दिलीप स्वामी
सोलापूर – कोरोना गेला नाही. सराव कामे बाजूला ठेवून लसीकरण करा. लसीकरणास साथ न दिलेस शासकीय लाभावर निर्बंध असणार आहेत. अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. अचानक लसीकरण केंद्र व गोपाळपूर येथे भेट दिले मुळे अधिकारी कर्मचारी धास्तीने होते..! आज गोपाळपूर ग्रामपंचायत येथे कमी लसीकरणाचे पार्श्वभुमीवर भेट देऊन ग्रामस्थांशी […]











