ताज्याघडामोडी

नगर रचना अभियंत्याच्या ‘वसूलदारास’ २० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

नगर पालिका क्षेत्रातील विकास कामे,बांधकाम परवाने,आणि विकसन व अतिक्रमण या बाबत सुनियोजीत आणि राज्य शासनायाची ने निर्धारित केलेल्या  नियमावली व निकषानुसार कार्यवाही करण्यात नगर पालिकेतील राजकीय सत्ता आणि दबाव यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेत हि जबाबदारी नगर रचनाच्या सहा. नगररचनाकार यांच्यावर टाकण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला.यासाठी शासनाच्या नगर रचना विभागातील अभियंते,नगररचनाकार,साह्याय्यक नगर रचनाकार आदींची नगर पालिकांमध्ये प्रतिनियुक्ती केली जाऊ लागली.चांगल्या हेतूने राज्य शासनाने हि व्यवस्था अमलात आणली खरी पण अनेक ठिकाणी नगर रचनाचे नगर पालिकांमध्ये प्रतिनियुक्त झालेले अभियंते याचा गैरफायदा उचलत बांधकाम परवाने,वापर परवाने,स्थायी बाधंकामाच्या स्वरूपात झालेली अतिक्रमणे या बाबत कार्यवाही करताना अवास्तव पैशाची मागणी केली जात असल्याचा अनुभव अनेकांना आल्याची चर्चा होताना दिसून येते.परंतु परवानगीच्या दगडाखाली हात अडकलेला असल्याने सामान्य नागिरक तक्रारीसाठी धजावत नसल्यानेच या क्षेत्रात काही दलालांचा प्रवेश झाल्याची चर्चा होऊ लागली होती.मात्र इचलकरंजी नगर पालिकेत गुंठेवारी प्रकरणाची प्रलंबित असलेली फाईल निकाली काढण्यासाठी नगर रचना अभियंता बबन खोत याने मध्यस्था मार्फत २५ हजाराची लाच तक्रारदारास मागितली.या बाबत तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत सदर अभियंता बबन खोत व त्याचा वसूलदार किरण कोकाटे याना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे.
        लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईचा हा प्रकार इचलकरंजी नगर पालिकेत घडला असला तरी याची चर्चा पंढरपूर शहरातही जोरदार होऊ लागली आहे.  
 पंढरपुरात नगर रचनाच्या कार्य पद्धितीबद्दलही नाराजीचा सूर 
 पंढरपूर शहरात सध्या नगर रचना विभागाचे स्वप्नील डोके,अतुल केंद्रे आणि सोमेश धट हे तीन अधिकारी प्रतिनियुक्तीवर नगर रचना अधिकारी व सहायक म्हणून कार्यरत आहेत आहेत.एखादया शहराचा विकास होत असताना तो अस्ताव्यस्त होऊ नये,बांधकाम परवाने निर्गमित होताना ते नगर विकास विभागाने निर्धारित केलेल्या नियमानुसार मंजूर केले जावेत.नगर रचना अधिकारी म्हणून नगर रचना योजना तयार करणे,प्राधिकृत मूल्यनिर्धारन अधिकारी म्हणून काम करणे,केंद्र पुरस्कृत शहर विकास योजनेसाठी सल्ला देणे,एकात्मिक गृह निर्माण योजना व झोपडपट्टी विकास योजनेबाबत अभिप्राय देणे,नवीन बांधकाम व वापर परवाने देताना नगर विकास विभागाने घालून दिलेल्या अटींचे,शर्थीचे व नियमाचे पालन करण्यासाठी अभिप्राय देणे,शहरातील अतिक्रमणे आणि अनियमित बांधकामे यावर कारवाई बाबत उपायोजना करणे आदी महत्वपूर्ण जबाबदारी पंढरपूर नगर पालिकेत नगर रचनाकार, सहाय्यक नगर रचनाकार यांच्यावर आहे.मात्र हि जबाबदारी पार पडताना नगर रचनांचे अधिकारी स्वप्नील डोके,अतुल केंद्रे यांच्यावर असून नगर रचना विभागाचे सोमेश धट झे मात्र नुतकेच रुजू झाले आहेतपंढरपूर शहरात सध्या नगर रचना विभागाचे स्वप्नील डोके,अतुल केंद्रे आणि सोमेश धट हे तीन अधिकारी प्रतिनियुक्तीवर नगर रचना अधिकारी व सहायक म्हणून कार्यरत आहेत आहेत.एखादया शहराचा विकास होत असताना तो अस्ताव्यस्त होऊ नये,बांधकाम परवाने निर्गमित होताना ते नगर विकास विभागाने निर्धारित केलेल्या नियमानुसार मंजूर केले जावेत.नगर रचना अधिकारी म्हणून नगर रचना योजना तयार करणे,प्राधिकृत मूल्यनिर्धारन अधिकारी म्हणून काम करणे,केंद्र पुरस्कृत शहर विकास योजनेसाठी सल्ला देणे,एकात्मिक गृह निर्माण योजना व झोपडपट्टी विकास योजनेबाबत अभिप्राय देणे,नवीन बांधकाम व वापर परवाने देताना नगर विकास विभागाने घालून दिलेल्या अटींचे,शर्थीचे व नियमाचे पालन करण्यासाठी अभिप्राय देणे,शहरातील अतिक्रमणे आणि अनियमित बांधकामे यावर कारवाई बाबत उपायोजना करणे आदी महत्वपूर्ण जबाबदारी या नगर रचनाच्या कर्मचाऱ्यांवर आहे.
      पंढरपूर शहराचा विकास हा तीर्थक्षेत्र म्हणून सुयोग्य पद्धतीने होणे अपेक्षित असल्याने नगर रचनाच्या या अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी आहे.मात्र शहरातील स्थायी बांधकामाच्या अतिक्रमणावर कारवाई करताना दुजाभाव केला जात असल्याचे वेळावेळी निर्दशनास आले आहे.अतुल केंद्रे यांच्या कार्यपद्धिती बाबत नागिरकांमध्ये कमालीची नाराजी असून या बाबत मुख्याधिकाऱ्याकडे वेळावेळी तक्रारी करूनही तेही या बाबत हतबल आहेत कि काय अशी परिस्थिती पंढरपुरात दिसून येत आहे.
      पंढरपुर शहरातील नगर पालिकेच्या मालकीच्या जागेत प्लॉट पाडून विक्री केल्याबाबत तसेच शहरातील इतरही काही भागात अनधिकृत आणि न.पा.मालकीच्या जागेत गाळे काढून भाड्याने देण्यात आल्याच्या तक्रारी अगदी हायकोर्टापासून ते सह.आयुक्त नगर पालिका प्रशासन शाखा सोलापूर यांच्याकडे वेळोवेळी करण्यात आल्या.मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचे दिसून आले.१० ऑगस्ट रोजी सहा.आयुक्त आशिष लोकरे यांनी पंढरपूर नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्राप्त तक्रारी बाबत उचित कारवाई करण्यात यावी व त्याचा अहवाल पाठवावा असे आदेश दिले होते.मात्र या आदेशाची दखल मुख्याधिकारी व जबाबदार नगर रचना अधिकारी यांनी न घेतल्याने आशिष लोकरे(सह.आयुक्त नगर पालिका प्रशासन सोलापूर) यांनी २९ सप्टेंबर रोजी स्मरण पत्र पाठवत कारवाई बाबत विचारणा केली आहे.आता सह.संचालक नगर रचना सोलापूर यांनीच या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे.           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *