गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नानंतर 15 वर्षांनी फेसबुकवर भेटला प्रियकर; दोन मुलांना सोडून महिला पळाली

प्रेम आधळं असतं…प्रेमात सर्व क्षम्य असतं…प्रेमासाठी काहीही… असे अनेकजण म्हणतात. मात्र, प्रेमामध्ये काही धक्कादायक किंवा आश्चर्यचकीत करणाऱ्या घटनाही घडतात. पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अशीच आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. विवाहित महिलेला लग्नाच्या 15 वर्षांनंतर फेसबुकवर प्रियकर भेटला. त्यांच्यातील प्रेम पुन्हा बहरले आणि प्रेमात वाहवत जात महिलेने दोन मुलांना सोडून प्रियकरासोबत पलायन केले आहे. पोलीस महिलेचा शोध […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणीचे अश्‍लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितले 20 लाख, एकाला अटक

तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 20 लाखांची खंडणी मागणाऱ्याला सांगलीच्या मिरज पोलिसांनी अटक केलीय. यल्लाप्पा चंद्रकांत कोळी असं अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून आरोपीनं कॉलेज तरुणीची अश्लील चित्रफीत तयार केली. ती क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आरेपीनं 20 लाखांची खंडणी मागितली होती.  

ताज्याघडामोडी

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू, शिक्षणमंत्र्यांची माहिती

राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार असून शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावानुसार पहिली ते बारावी नियमित वर्ग सुरू होणार. प्रीप्रायमरीचे वर्ग देखील कोरोना नियम पाळून भरण्यास शिक्षण विभागाची परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱया विविध […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

“अफवा पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्स बंद करणार”, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

अफवा पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती. आता या निर्णयानंतर केंद्र सरकार अशा वेबसाइट्स आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नगरपंचायत निवडणूक निकालानंतर दोन गटात धुमश्चक्री, मारहाणीत एकाचा मृत्यू

राज्यभरातील नगरपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाला असून या निकालात भाजपने बाजी मारत 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेला 4 जागा व कॉंग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीत एकाचा मृत्यू […]

ताज्याघडामोडी

फेक कोविड सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून फर्दाफाश

कोविड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.  मुंबई क्राइम ब्रँच युनिट १० ची गोरेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी लस न घेतलेल्यांना, लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र देत होते. कोविड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक […]

ताज्याघडामोडी

सर्वोच्च न्यायालयाचा आगामी निवडणुकांमधील OBC आरक्षणावर महत्वाचा निर्णय

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ओबीसी आरक्षणाची मागणी चांगलीच गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयातही हा मुद्दा पोहोचला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यावर आज झालेल्या सुनावणीमध्ये महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मार्चमध्ये होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणासह होणार की नाही याचा निर्णय आता राज्याने नेमलेला राज्य मागासवर्ग आयोग घेणार आहे. महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा त्यांनी आयोगाला […]

ताज्याघडामोडी

मार्चपर्यंत संपूर्ण देशाला दिलासा मिळणार

संपूर्ण जगावर असलेलं कोरोनाचं संकट केव्हा दूर होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी सतावत असतो. या प्रश्नाचं उत्तर सापडायला सुरुवात झाली आहे. वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग विभागाच्या समीरण पांडा यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. पांडा यांनी म्हटलंय की 11 मार्चपर्यंत कोरोनाचा खात्मा व्हायला सुरुवात होईल आणि या महामारीच्या अंतालाही सुरुवात झालेली पाहायला मिळेल. आपण कोरोनापासून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पब्जीच्या वादातून तरुणाचे अपहरण, बँकेतून काढले पैसे

पब्जी खेळाच्या वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या बँक खात्यातून पैसे काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी असदअली अश्रफअली शेख, दिवेश रेड्डी, आतिफ शेख, राजेश बेंडर, रसूल शेखला अटक केली आहे. तक्रारदाराची काही दिवसांपूर्वी आरोपीसोबत फेसबुकवरून ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मोबाईलवर पब्जी खेळायचे. अटक आरोपीपैकी एकाने तक्रारदाराला पब्जी खेळासाठी […]

ताज्याघडामोडी

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु?; वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरुन नाराजी आणि विरोध होत आहे. विद्यार्थी पालकांसह शिक्षकांनीही सरसकट शाळा बंद विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्या, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यासंबंधी सरकार […]