ताज्याघडामोडी

फेक कोविड सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून फर्दाफाश

कोविड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.  मुंबई क्राइम ब्रँच युनिट १० ची गोरेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी लस न घेतलेल्यांना, लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र देत होते. कोविड लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुंबई क्राइम ब्रँच युनिट १० ची गोरेगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी लस न घेतलेल्यांना, लसीच्या दोन्ही डोसचे बनावट प्रमाणपत्र देत होती आणि त्याबदल्यात १५०० रुपये घेत असे.

पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच मुंबई क्राईम ब्रँच युनिट दहाच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली. या आरोपींनी ७० ते ७५ जणांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. पोलीस या आरोपींकडून अधिक तपास करत ही लिंक कुठवर गेली आहे याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर मशीन आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर थैमान घालतोय. त्यामध्ये लसीकरण करणे हे फार आवश्यक आहे. यातच अनेक जण याचा फायदा घेत, गैरप्रकार करत असल्याचे अनेक ठिकाणी उघड झाले आहे. त्यामध्ये मुंबईत देखील अशा प्रकारे बनावट covid-19 लस देणारी टोळी पोलिसांनी पकडली. आरोपी अनेक कंपन्यांचे लसीकरण झाल्याचा सर्टिफिकेट देत होते. हे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *