लग्नास नकार दिल्याने संतप्त प्रियसीने चाकूने वार करून प्रियकराची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलेली आहे. नागपूरच्या वाडी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय ढोके असे या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर पूजा असे हल्लेखोर प्रेयसीचे नाव आहे. अक्षय एका खाजगी कंपनीत कामाला आहे.पूजा घटस्फोटीत आहे. गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये […]
ताज्याघडामोडी
सहकारी संस्थांकडील तारण मालमत्तांची विक्री करताना कर्जदाराला माहिती देणे बंधनकारक, सहकार आयुक्तांचे निर्देश
राज्यातील एखाद्या सहकारी संस्थेला आपल्याकडे तारण असलेल्या मालमत्तेची विक्री किंवा लिलाव करावयाचा असेल तर त्याची माहिती संबंधित कर्जदाराला किंवा मालमत्तेच्या मालकाला देणे, त्यांची बाजू ऐकून घेणे सहकार आयुक्तांनी बंधनकारक केले आहे. तसेच मालमत्तेची विक्री करण्याआधी त्याचे वाजवी मूल्यांकन काढावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच मूल्यांकन ठरवण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची वेळेत […]
५०० रुपये सुट्टे करायचे म्हणून घेतलं लॉटरीचं तिकिट, ५ तासांनी झाला करोडपती
कोणाचे नशीब कुठे फळफळेल हे सांगता येत नाही. केरळमधील एका व्यक्तीला असाच एक नशीब पालटवणारा अनुभव आला आहे. या इसमाने 500 रुपयाची नोट सुट्टी करण्यासाठी लॉटरीचे तिकीट काढले आणि अवघ्या काही तासात तो करोडपती झाला. केरळ कोट्टायम येथील सदानंदन ओलीपराम्बिल असे या व्यक्तीचे नाव आहे. सदानंदन रविवारी सकाळी भाजी आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र भाजी […]
बायको मुलांना विष दिलं, मग स्वतः गळफास घेतला! अख्ख्या कुटुंबानं केली आत्महत्या
मदन चायनीज नावाच्या व्यक्तीनं घरातील तिघांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मदन चायनीज यांना दोन मुलं होतं. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना आधी विष दिलं. त्यानंतर बायकोलाही विष दिल्यानंतर स्वतः गळफास घेत आयुष्य संपवलं. नेमकी त्यांनी आत्महत्या का केली, हे कळू […]
पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहून तरुणाचा संताप; आरोपीला स्फोटात थेट उडवूनच टाकलं!
सूड उगवण्याच्या अनेक कहाण्या तुम्ही आतापर्यंत वाचल्या असतील. मात्र ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील रत्तागड नावाच्या छोट्याशा गावातील आहे. येथे 4 जानेवारी रोजी एक शेतकरी शेतात ट्यूबवेलचं बटन दाबतो आणि स्फोटात तो छिन्नविधिन्न होतो. स्फोटाचा आवाज एक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येतो. काही वेळानंतर गावकरी तेथे पोहोचले तोपर्यंत त्याचा […]
गुटखा माफियांचे मोठे मासे गळाला लागले, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
बुलडाणा जिल्हा हा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं होमटाऊन आहे. एफडीए मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध धंदे होतायत का, याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. मात्र गुटखा माफियांच्या विरोधात प्रामुख्याने खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या परिक्षेत्रामध्येच म्हणजे घाटाखालील तालुक्यात कारवाई होताना दिसत आहे. आतापर्यंत कधीही पोलिसांच्या हातात न आलेले दोन गुटखा माफियांच्या […]
धावत्या कार समोर उडी घेऊन एसटी चालकाची आत्महत्या; एसटीने केले होते बडतर्फ
राज्यात अनेक दिवसांपासून एसटीचा संप चालूच असून अद्यापही यावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. संपादरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. दरम्यान बडतर्फ कर्मचारी मोठ्या मानसिक स्थितीतून जाताना दिसून येत आहेत. अशीच एक घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील एका एसटी चालकाने धावत्या कार समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील […]
‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य
‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला’ असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदारसंघात […]
एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा कामगार न्यायालयाचा निर्वाळा
मुंबईतील कामगार न्यायालयाने मागील अडीच महिन्यांपासून सुरू असणारा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला आहे. न्यायालयाने हा निकाल एसटी महामंडळाकडून दाखल केलेल्या तक्रार अर्जावर दिला आहे. एसटी ही लोकोपयोगी सेवा असताना देखील सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस न दिल्यामुळे न्यायालयाने निर्वाळा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हा संप बेकायदेशीर असून याकरिता जवळपास दीड […]
Omicron कोरोनाचा व्हेरिएंट नसून वेगळी महामारी? शास्त्रज्ञाचा मोठा दावा
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या नव्या व्हेरिएंटवर रिसर्च करत असताना व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर टी जॅकब जॉब यांनी ओमायक्रॉनबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉन कोरोना महामारीपेक्षा वेगळा आहे आणि यामुळे या दोन वेगवेगळ्या महामारी एकसोबतच पसरत असल्याचं आपण मानायला हवं. डॉ जॅकब जॉन म्हणाले, की ओमायक्रॉन वुहान-डी […]











