ताज्याघडामोडी

Omicron कोरोनाचा व्हेरिएंट नसून वेगळी महामारी? शास्त्रज्ञाचा मोठा दावा

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या नव्या व्हेरिएंटवर रिसर्च करत असताना व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर टी जॅकब जॉब यांनी ओमायक्रॉनबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉन कोरोना महामारीपेक्षा वेगळा आहे आणि यामुळे या दोन वेगवेगळ्या महामारी एकसोबतच पसरत असल्याचं आपण मानायला हवं.

डॉ जॅकब जॉन म्हणाले, की ओमायक्रॉन वुहान-डी 614 जी, अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, कप्पा किंवा म्यूद्वारे उत्पन्न झालेला नाही आणि हे निश्चित आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या ‘सेंटर ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजी’चे माजी संचालक जॉन म्हणाले, ‘माझ्या मते हा अज्ञात वंशाचा प्रकार आहे, परंतु तो वुहान-डी 614G शी संबंधित आहे.

ते म्हणाले की D614G या प्रोटीनमध्ये अमीनो ऍसिड म्यूटेशन दर्शवितं, जे जगभरातील SARS-CoV-2 विषाणूमध्ये वाढत्या प्रमाणात सामान्य झालं आहे. दोघांमुळे होणारे आजारही वेगवेगळे आहेत. एक म्हणजे न्यूमोनिया-हायपोक्सिया-मल्टीऑर्गन डॅमेज डिसीज, तर दुसरा श्वसन रोग आहे.

काही ठिकाणी कोरोनाची प्रकरणं कमी होऊ लागली आहेत, अशात तिसरी लाट शिगेला पोहोचली आहे का, असं विचारलं असता जॉन म्हणाले की संक्रमण पहिल्यांदा महानगरांमध्ये सुरू झालं आणि ते तिथेच आधी संपेल. ते म्हणाले की, ‘या सगळ्या मिळून राष्ट्रीय महामारी आहेत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *